Eknath Shinde Vishakha Raut : ‘पद वाचवा, २० नगरसेवक फोडते’; विशाखा राऊत यांचा एकनाथ शिंदेंना प्रस्ताव? समाधान सरवणकरांचा धक्कादायक दावा

Mumbai politics : विशाखा राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कथित चर्चेवरून मुंबईच्या राजकारणात खळबळ; समाधान सरवणकरांनी केला मोठा दावा.
Eknath Shinde Vishakha Raut Mumbai politics

Eknath Shinde Vishakha Raut Mumbai politics

esakal

Updated on

Vishakha Raut corporator : शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द होताच शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी एक खळबळजणक वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विशाखा राऊत यांनी दोनवेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. ‘अपात्रतेच्या कारवाईतून मला वाचवा, मी २० नगरसेवक फोडून पक्षात आणते; मात्र मला या सगळ्यातून बाहेर काढा,’ असा प्रस्ताव त्यांनी शिंदे यांच्यासमोर ठेवल्याचा दावा समाधान सरवणकर यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com