आता मैदानाखाली होणार तळी ? "वॉटर होल्डिंंड टॅंक", पाणी निचर्याचा पॅटर्न बदलणार 

आता मैदानाखाली होणार तळी ? "वॉटर होल्डिंंड टॅंक", पाणी निचर्याचा पॅटर्न बदलणार 

मुंबई : पावसाळ्यात बुडणारी मुंबई वाचविण्यासाठी महापालिका आता नवा प्रयोग करणार आहे. मैदानांखाली तळी तयार करुन त्यात पावसाचे पाणी साठवले जाणार असून लवकरच या प्रकल्पाच्या अभ्यासाठी समिती गठित करुन निवीदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे.

दर पावसात किमान दोन तीन वेळा मुंबई ठप्प होते. यावर उपाय म्हणून तत्कालीन महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी जपानी पध्दतीने भुमिगत जलाशय बनवण्याचा पर्याय पुढे आणला होता. त्यासाठी त्यांनी जपान इंटरनॅशनल कॉर्पेारेशन एजन्सी बरोबर चर्चाही केली होती. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी 5 कोटी रुपयांची तरतूदही महापालिकेने केली होती. मात्र, एकचं मोठे भुमिगत  जलाशय बांधून त्यात पाणी साचून ठेवणे खर्चिंक होणार असल्याचा दावा करत पालिकेने आता जपानी प्रयोग बाजूला ठेवून दक्षिण कोरियाचा पर्याय स्विकारला आहे.

दक्षिण कोरियात पावसाळी पाणी अडविण्यासाठी लहान लहान भुमिगत तळी तयार करण्यात आली आहे. त्याच पध्दतीने मुंबईतील मैदानांखाली तळी बांधण्याचा विचार सुरु आहे. असे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुंबईच्या परीस्थीतीचा आढावा घेऊन " वॉटर होल्डिंग टॅंकचा" पर्याय विचारधीन आहे. त्यावर पालिकेने काम करावे राज्य सरकार त्यांना पाठिंबा देईल असे नमुद केले.

काय आहे वॉटर होल्डिंंड टॅंक 

सध्या मुंबईतील पावसाचे पाणी नदी, नाले, खाड्यांमधून नैसर्गिक रित्या समुद्रात जाते. मात्र, समुद्राला भरती असल्यास पाण्याचा निचरा होत नाही. यावर उपाय म्हणजे हे पावसाचे पाणी तळ्यांमध्ये साठवून भरती ओसरल्यावर ते समुद्रात सोडता येईल. अथवा त्या पाण्यावर प्रक्रीया करुन फेरवापरही करता येईल. 

काय करावे लागेल 

मुंबईतील विशेषता दक्षिण मुंबईतील पर्जन्यवाहीन्या या ब्रिटीश कालीन 100 वर्षाहून जून्या आहेत. पावसाळी पाणी या वाहीन्या एका मार्गातून समुद्र आणि खाडी पर्यंत घेऊन जातात. मात्र, या वाहीन्याचा मार्ग बदलून त्या अशा तळ्या पर्यंत आणाव्या लागतील. ही तळी प्रामुख्याने मैदानाखाली तयार करण्यात येतील. तेथे पाणी आणण्यासाठी पर्जन्य वाहीन्यांची नवी डिझाईन तयार करावी लागणार.

( संपादन - सुमित बागुल )  

water holding tanks under grounds of mumbai new concept which will help in monsoon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com