

Mumbai Water Cut
ESakal
मुंबई : पूर्व उपनगरातील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील अनेक भागात गुरुवार आणि शुक्रवारी पाणी मिळणार नाही. यामध्ये मानखुर्द, गोवंडी, शिवाजी नगर, देवनार आणि चेंबूरमधील भागांचा समावेश आहे. एकूण ३० तास पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील. बीएमसीने लोकांना पाणी जपून वापरण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे. तीन दिवस पिण्यापूर्वी पाणी फिल्टर करून आणि उकळून पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.