... तर राज्यभर आंदोलन करून विजबीलांची होळी करणार; 'या' संघटनेने दिला ऊर्जामंत्र्यांना इशारा...

तेजस वाघमारे
Monday, 3 August 2020

हजारो रुपयांची बिले भरायची कशी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे.

मुंबई  : वाढीव विजबिलाबाबत नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याने मराठी भरती संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता.4) राज्यभरात  वीज बिल होळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने तातडीने याबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या अध्यक्षा पूजा बडेकर यांनी दिला आहे.

धनंजय मुंडेना कोणी पाठवली नशाबंदीची राखी? नक्की काय केलीये मागणी वाचा

लॉकडाऊनच्या कालावधीत वीज कंपन्यांनी नागरिकांना सरासरी वीज बिले दिली. जून महिन्यात आलेल्या बिले पाहून नागरिकांना मोठा धक्का बसला. अनेक रोजगार ठप्प झाल्याने नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. या परिस्थितीत हजारो रुपयांची बिले भरायची कशी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे. वीज कंपन्यांनी पाठवलेल्या भरमसाठ विजबिलांमधून 300 युनिट पर्यंत बिल माफ करावे, अशी मागणी मराठी भारती संघटना वारंवार करत आहे. यासाठी आंदोलनेही केली आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदनही दिले आहे.

BMC च्या कॉस्ट कटिंगचा 'बेस्ट' उपक्रमाला फटका; अनुदानात 'इतक्या' कोटींची कपात शक्य?

राज्यात विविध संघटनांकडून वीज बिलाची माफी करण्याची मागणी होत असताना सरकार मूग गिळून गप्प बसल्याने सरकारला जागे करण्यासाठी 4 ऑगस्टला राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विविध संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या कार्यध्यक्षा विजेता भोनकर यांनी केले आहे.

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we will organize a statewide agitation against electric bills this organization warns energy minister ...