पश्चिम रेल्वेने केली आठवड्याभरात 'इतक्या' लाखाची कमाई, तर 'इतक्या' जणांनी केला प्रवास

westurn railway.
westurn railway.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रेल्वे मंत्रालयाने अत्याश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलची सेवा15 जुन पासून सुरू केली आहे. या प्रवासी वाहतूकीच्या माध्मातून पश्चिम रेल्वेने 47 लाखांचा महसूल मिऴवला आहे. तर 14 हजार 666 जुन्या पासांना सुद्धा मुदतवाढ देण्यात आली असून पश्चिम रेल्वे मार्गावर दैनंदिन सुमारे 50 हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी, बेस्ट सेवेवर अधिक भार येत असल्याने, या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेची मागणी केली होती. त्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे तशी मागणी केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालाय आणि राज्य सरकारच्या चर्चेनंतर यावर एकमत झाल्याने, 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर एकूण 350 फेऱ्या सुरु केल्या आहेत.

यामधून आतापर्यंत पश्चिम रेल्वेने 47 लाख 36 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. तर 2 लाख 62 हजार 667 प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामध्ये नालासोपारा, विरार, बोरीवली, अंधेरी या स्थानकातून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे.

14 हजार 66 पास धारकांना मुदतवाढ
राज्यात 22 मार्च पासून लॉकडाऊन असल्याने, लोकलची वाहतूक बंद होती. त्यामुळे नियमीत लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पासेस बुडाले. परिणामी पहिल्या टप्यात अत्यावश्यक सेवेतील कामगारांचे पासचे शिल्लक दिवसांचा मुदतवाढ देण्यात आले आहे. त्यासाठी जुन्या पासवर तिकिट खिडक्यांवर शिक्का मारुन देण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवर 21 जुन पर्यत सुमारे 14 हजार 66 पासधारकांना मुदतवाढ देण्यात आली. 

तिकिटांची आकडेवारी
दैनंदिन प्रवासांच्या तिकीट संख्या -   पास - मुदतवाढ – महसुल (रुपये)
21 जून – 2,529 -  727 - 772 -  2,52,489 
20 जून – 4,031 - 964 – 1,355 – 3,39,812 
19 जून – 5,206 – 1,292 – 1,935 – 4,53,140 
18 जून – 4,592 – 1,368 – 2,159 – 4,72,008 
17 जून – 5,350 – 2,068 – 3,583 – 6,74,591 
16 जून – 6,799 – 4,095 – 3,910 – 13,69,294 
15 जून – 6,889 – 3,236 - 952 – 11,75,178

the western railway earned 47 lakhs in a week, more than two and a half lakh people traveled

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com