esakal | कोट्यवधींचा खर्चानंतरही 'हे' पार्क पडलंय धुळखात!
sakal

बोलून बातमी शोधा

कोट्यवधींच्या खर्चानंतरही 'हे' पार्क पडलंय धुळखात!

घणसोली सेक्‍टर- 3 मध्ये पालिकेच्या वतीने 10 हेक्‍टरवर भव्य सेंट्रल पार्क उभारण्यात आले आहे. पार्कचे काम होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला गेल्यानंतरही ते उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

कोट्यवधींचा खर्चानंतरही 'हे' पार्क पडलंय धुळखात!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : घणसोली सेक्‍टर- 3 मध्ये पालिकेच्या वतीने 10 हेक्‍टरवर भव्य सेंट्रल पार्क उभारण्यात आले आहे. पार्कचे काम होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला गेल्यानंतरही ते उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या पार्कचे लोकार्पण कधी होणार, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे. लोकसभा; त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूक आचारसंहितेनंतर आता पालिका निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळे या पार्कचे लोकार्पण पुन्हा आचारंसहितेच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. 

ही बातमी वाचली का? उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज

घणसोली सेक्‍टर- 3 मध्ये 10 हेक्‍टर परिसरात 17 कोटी रुपये खर्च करून पालिकेने भव्य-दिव्य असे सेंट्रल पार्क साकारले आहे. 2015 मध्ये सेंट्रल पार्कच्या कामाला सुरुवात झाली. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कामात सुरुवातीच्या दोन वर्षांत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ज्या ठिकाणी सेंट्रल पार्क उभारण्यात येत आहे, त्या ठिकाणच्या एका भूखंडावर सावली गाव होते. या सावली गावाचे सिडकोकडून पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून "प्रथम पुनर्वसन करा, मग पार्क उभारा', असा घाट घालण्यात आल्याने पार्कचे काम संथगतीने सुरू होते. सर्वसाधारण सभेत मुद्दा मांडत सावली गावातील ग्रामस्थांनी पार्कला विरोध दर्शवला होता. तर आता पार्कचे काम पूर्ण होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला गेल्यानंतरही या पार्कचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. पंचमहाभुतांवर आधारित संकल्पनेनुसार हे पार्क विकसित केले आहे. या सेंट्रल पार्कचे कंत्राट स्वस्तिक इन्फ्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते. या पार्कमध्ये स्केटिंक रिंक, जलतरण तलाव, मिनी फुटबॉल टर्फ आदी सुविधा निर्माण केलेल्या असून, या ठिकाणी क्रीडा विभागाकडून प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? शोएब अख्तरचे भारत-पाकिस्तानबद्दल मोठे विधान

शिवसेनेचा इशारा हवेतच विरला 
महापौरांकडून सेंट्रल पार्कचे उद्‌घाटन करण्यात येत नसल्यामुळे, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी प्रशासनाने पार्कचे उद्‌घाटन न केल्यास, त्याचे उद्‌घाटन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांचा हा इशारा हवेतच विरला आहे. मनसेनेदेखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, आता पालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सेंट्रल पार्कचे लोकार्पण रखडणार असल्याचे दिसून येत आहे. 

ही बातमी वाचली का? कर्नाळा बॅंक घोटाळा; विवेक पाटलांसह 76 जणांवर गुन्हा दाखल 

घणसोलीतील सेंट्रल पार्कचे काम पूर्ण झाले आहे. लोकार्पण करण्यासाठी महापौरांकडे मागणी करण्यात येणार आहे. त्यांच्या निर्णयांनतर उद्‌घाटन करण्यात येईल. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका. 

सावली गावाच्या पुनर्वसनासाठी सिडकोकडून भूखंड प्राप्त होणार आहे. सिडकोने पालिकेला भूखंडाचे पैसे भरण्यास सांगितले आहे. पालिकेने सिडकोच्या भूखंडाची रक्कम भरल्यानंतर, रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यानंतर सेंट्रल पार्कचे उद्‌घाटन करण्यात येईल. 
- जयंवत सुतार, महापौर, नवी मुंबई.