esakal | कमकुवत इमारती जमीनदोस्त कधी होणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

कमकुवत इमारती जमीनदोस्त कधी होणार ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेरळ : कर्जत (Karjat) शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या (Hospital) आवारातील तीन इमारती प्रशासनाने धोकादायक घोषित केल्या आहेत. त्या जमीनदोस्त कराव्यात, असे आदेश असतानाही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे, असा आरोप सम्यक विद्यार्थी संघटनेने केली आहे.

हेही वाचा: हिंगोलीत सार्वजनिक दसरा महोत्सवाचे बासा पूजन

गेल्या चार वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयाच्या |तिन्ही जुन्या इमारती जमीनदोस्त केल्या नाहीत. या वर्षी त्यांना धोकादायक इमारतीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. याबाबत सम्यक विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. कैलाश मोरे यांनी तक्रार केली आहे.

loading image
go to top