esakal | क्षयरोगाचे अचूक निदान व उपचार करण्यामध्ये होल जिनोम स्क्विन्सिंग तंत्रज्ञान उपयुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

क्षयरोगाचे अचूक निदान व उपचार करण्यामध्ये होल जिनोम स्क्विन्सिंग तंत्रज्ञान उपयुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत (Mumbai) क्षयरोग जागरूकता आणि निर्मूलन पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला असून आयआयटी (IIT) मुंबईच्या हेस्टॅक अँनालिटिक्स( Hestack Analytics) या स्टार्टअप कंपनीने क्षयरोगाचे (TB) अचूक निदान आणि उपचार करण्यासाठी  विकसित केलेले "होल जिनोम स्क्विन्सिंग तंत्रज्ञान" अत्यंत उपयुक्त असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले.

आयआयटी मुंबईच्या हेस्टॅक अँनालिटिक्स या स्टार्टअप कंपनीच्या वतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून होल जीनोम स्क्विन्सिंग मशीनद्वारे 500 नागरिकांचे क्षयरोगाचे अचूक निदान आणि उपचार मोफत करणाऱ्या पंधरवड्याचे आयोजन  करण्यात आले आहे. या पंधरवड्याचे उद्घघाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक सचिन पडवळ, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, आयआयटी मुंबईचे संशोधक डॉ. अनिर्वाण चॅटर्जी, डॉ. अमृतराज झाडे, प्रा. किरण कोंडाबागे, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे : सार्वजनिक गणेश मंडळांचा एकच गणपती

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आयआयटी मुंबईच्या हेस्टॅक अँनालिटिक्स या स्टार्टअप कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या नवीन उपक्रमाचे स्वागत करतो. आताच्या काळात क्षयरोगासाठी रामबाण उपाय असणारे हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णाचा कुठल्या प्रकारातील क्षयरोग झाला आहे याचे तातडीने निदान होऊन त्या प्रकारातील औषधपचार करणे डॉक्टरांना सुलभ होणार आहे.  क्षयरोगाचे 2025 पर्यंत समूळ उच्चाटन झाले पाहिजे, हे केंद्र सरकार व राज्य सरकारचे धोरण आहे. क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी  राज्य सरकार संपूर्ण राज्यभर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबवीत असतो. क्षयरोगाचे लवकरात लवकर निदान झाले व त्याच्यावर अचूक व वेळेत उपचार झाले तर क्षयरोगामधून पूर्णपणे रुग्ण हा बरा होतो.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने मृत्यूची संख्या जास्त आहे. होल जीनोम स्क्विन्सिंग मशीनद्वारे अचूक निदान व उपचार होणार असल्यामुळे रुग्ण हा तातडीने बरा होऊ शकेल. खासगी रुग्णालयांमध्ये या तपासणीचा दर जास्त आहे. मुंबई महानगरपालिकेत हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येईल. त्यानंतर सहा ते आठ महिन्याच्या कालावधीनंतर नियमितपणे होईल.

हेही वाचा: कृषी कायद्यांवरचा अहवाल सार्वजनिक करा; समितीच्या सदस्याचे SC ला पत्र

डॉ.अनिर्वाण चॅटर्जी म्हणाले की,  क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. कारण त्यावर औषधी आहे. पण त्यासाठी वेळेत, त्वरित तंतोतंत चाचणी आणि योग्य उपचार होणे हे गरजेचे आहे. याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तरच क्षयमुक्त राष्ट्र होतो.

loading image
go to top