बेडरूममध्ये भारतीय पुरुष स्वार्थी होतात, महिलांनी शेअर केला अनुभव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

लग्नानंतर महिलांचा सेक्स बद्दल उत्साह कमी होतो. अनेक भारतीय महिलांची हीच कहाणी आहे. मात्र याचं नक्की कारण काय? नक्की बायकोला आपल्या नवऱ्याकडून काय हवं असतं? याचा एका इंग्रजी वृत्तसमुहाने सर्व्हे केलाय. या सर्व्हेमध्ये महिलांनी उत्सुर्तपणे आपलं म्हणणं मांडलंय. या सर्व्हेतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात. लग्नानंतर भारतीय महिलांची सेक्स लाइफ ही फारच बोअरिंग होते किंवा त्यांना सेक्समध्ये फारशी रुची नसल्याचं त्यांनी  सांगितलंय.  

सेक्सबद्दल महिलांची निराशा होण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत. घरातील रोजचं काम, सासू सासऱ्यांची सेवा, संपूर्ण दिवस मुलांच्या मागे दिवस घालवल्यानंतर महिलेला तिच्या पतीकडून प्रेमाचा स्पर्श हवा असतो. मात्र, पुरुषांकडून भावनात्मक समर्थन मिळत नसल्याने महिलांमधील सेक्स बद्दलची भावना दिवसेंदिवस कमी होत जाते. त्या सेक्सला एखादं काम म्हणूनच करत असतात असा अनुभव महिलांनी बोलून दाखवला.     

पिलाला लागला शॉक, माकडाची आई त्याला घेऊन पोहोचली दवाखान्यात.. 

यामध्ये मोठा वर्ग हा काम करणाऱ्या महिलांचा आहे. दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर घरच्या कामाची जबाबदारी या पार पाडत असतात. अशातच घरी आल्यानंतर नवऱ्याकडून प्रेम आणि आदराची अपेक्षा बायकोकडून केली जाते. असं जर झालं नाही तर त्यांचे पती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बायकोच्या जवळ जात असल्याचा महिलांचा समज होतो.

अनेक महिलांचं असं देखील सांगणं आहे की, नवऱ्याच्या मते प्रेम करणं म्हणजे सेक्स करणं असाच आहे. या व्यतिरिक्त नवऱ्याकडून त्यांच्या इतर कोणत्याही इतर, इतर मागण्या किंवा इच्छा समजून घेतल्या जात नाहीत. त्यामुळे देखील महिलांचं त्यांच्या आपल्या नवऱ्याबद्दलचं लैंगिक आकर्षण कमी होतं.  

भारतात 'या' शहरातील तरुण सर्वात आधी गमावतात आपली व्हर्जिनिटी..
 
भारतात आता कुठे महिला किंवा पुरुषही लैंगिकता या विषयावर बोलायला लागलेत. अशात अनेकदा या विषयवार नवऱ्याशी कसं बोलायचं हा विचार करून लग्न झालेल्या महिला संकोच करतात. याचा परिणाम महिलांच्या लैंगिक आयुष्यावर होतो. 

यात सर्वात जास्त महिलांनी असंही सांगितलं की सेक्स दरम्यान त्यांचा नवरा त्यांची त्यांची खूप काळजी घेतो. त्यानंतर मात्र, बायकोकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जातं असं अनेक महिलांनी सांगितलंय.   

why indian men become selfish when they are in their bed

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why indian men become selfish when they are in their bed

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: