सोमवारी आर्थिक राजधानी मुंबईला मिळणार दिलासा ?

सोमवारी आर्थिक राजधानी मुंबईला मिळणार दिलासा ?
Updated on

मुंबई : सोमवारपासून काही उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे मुंबईलाही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करण्यास परवानगी मिळालेल्या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत पासचे वाटप करण्यात येणार आहे.

मुंबईत आतापर्यंत अडीज हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, 450हून अधिक ठिकाणे सील करण्यात आली. त्यामुळे मुंबईत नेमक्या कोणत्या भागातील, कोणते उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी मिळेल, याबद्दल प्रश्न आहे; मात्र ज्या उद्योग-व्यवसायांना काम सुरु करण्याची परवानगी केंद्र आणि राज्य सरकारने दिली आहे, त्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयातून परवानगी पत्र देणार असल्याचे पालिकेने जाहिर केले आहे.

त्यामुळे मुंबईतही काही प्रमाणात व्यवसाय सुरु होण्याची शक्यता आहे. तरीही मुंबईतील कोणत्या ठिकाणच्या व्यवसायांना परवानगी द्यावी याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेईल, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी पालिकेने मुंबईतील 24 प्रशासकीय प्रभागांची  तीन प्रकारात विभागाणी केली आहे. त्यातील 8 प्रभाग अतिधोकादायक असून त्या क्षेत्रात कोणताही व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे.

असे मिळतील पास 

  • ज्या विभागात नोकरीला जायचे आहे त्या विभागात सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 9 या वेळेत दोन सहाय्यक विधी अधिकारी पास देतील.
  • यासाठी कर्मचाऱ्याने स्वयंघोषणा पत्र साध्या कागदावर द्यावे. 
  • रुग्णालय आणि दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रमुखच परवानगी पत्र देतील. 

हे विभाग रेड झोन 

  • वरळी प्रभादेवी -जी दक्षिण 
  • माझगाव भायखळा - ई 
  • ग्रँट रोड, मलबारहिल -डी 
  • धारावी, दादर -जी उत्तर 
  • अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम - के पश्चिम 
  • वांद्रे पुर्व - एच पुर्व
  • चेंबर - एम पुर्व 
  • अंधेरी पुर्व - के पुर्व 
  • कुर्ला - एल (या प्रभागाचा रेड झोन मध्ये नव्याने सहभाग होण्याची शक्यता आहे).

will few businesses start in mumbai from monday read full report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com