माथेरानला दिलासा मिळेल का?

माथेरानला दिलासा मिळेल का?

मुंबई : माथेरानमधील वाहतूक बंदी असलेल्या भागांमध्ये जीवनावश्‍यक सामान पोहचविण्याबाबत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरणचा समतोल साधून येथील वाहतुकीवरील निर्बंध शिथिल करता येतील का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण विभाग आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 

माथेरान निसर्ग रम्य ठिकाण असून पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आहे. येथील दस्तुरी नाक्‍याच्या पुढे वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. केवळ सफाई गाडी, रूग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे स्थानिक रहिवाशांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. अशावेळी जीवनावश्‍यक वस्तूंसाठी शंभर दोनशे रुपये अधिक खर्च करून गॅस, धान्य, भाजी आणायला घोडा गाडीवरून जावे लागत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचा साठा छोट्या गाडी किंवा टेम्पो मधून येथील रहिवाशांसाठी सुरू केला तर नागरिकांना दिलासा मिळेल असे सांगणारी याचिका माजी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. लॉकडाऊनमध्येही वाहतुकीवर निर्बंध ठेवल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. 

याचिकेवर न्या. शिरीष गुप्ते यांच्यापुढे बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाने निर्बंध शिथिल करण्याबाबत पर्यावरण विभाग आणि रायगड जिल्हाधिकारींना बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. माथेरानमधील सुमारे चार हजार रहिवासी आणि जवळपास असलेल्या आदिवासी पाडे आणि गावातील सुमारे 25 हजार नागरिकांना वाहतूक व्यवस्था नसल्याने पायी किंवा घोडागाडीवर सामान आणावे लागते. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com