लॉकडाऊन : सुविधा न मिळाल्यास सहकार्य नाही, 'या' कर्मचारी संघटनेचा इशारा

pds
pds

मुंबई : आपल्या जिवाची बाजी लावून गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा करणारे शिधावाटप कर्मचारी असुरक्षित वातावरणात काम करीत असून त्यांना योग्य सुविधा मिळत नसल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला आहे. 

शिधावाटप दुकानांमधून गरिबांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांनुसार स्वस्त दरात अन्नधान्य दिले जाते. वेगवेगळ्या गोदामांमधून हे अन्नधान्य ट्रकमधून शिधावाटप दुकानांमध्ये पोहोचवणे, तेथील साठ्यावर व त्याच्या वितरणावर लक्ष ठेवणे, धान्यसाठा, त्याचा दर्जा, हिशेब यांची तपासणी करणे आदी कामे शिधावाटप कर्मचाऱ्यांना दिवसभर करावी लागतात. गेले महिनाभर हे कर्मचारी अथकपणे काम करीत असून, सध्याच्या वातावरणात त्यांच्यावरील कामाचा ताण तसेच जबाबदारी वाढली आहे. मात्र संसर्गाची भीती असूनही या कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत, असा आरोप मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी 'सकाळ'शी बोलताना केला. 

बदलापूर, विरार, पनवेल अशा लांबलांबच्या ठिकाणांहून हे कर्मचारी बस, एसटी बदलत कसेतरी आपल्या कार्यालयात हजर होतात व तेथून तपासणीसाठी बाहेर पडतात. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांना बोरीवली, कळंबोली, तुर्भे, भिवंडी, तळोजा येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामातून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. तेथे एकूण ११ शिधावाटप निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हे शिधावाटप निरीक्षक गोदामातून अन्नधान्याच्या गाड्या सोडण्याचे काम करतात. परंतु कंळबोली गोदामात निरीक्षकांना बसण्याची व्यवस्था गोदाम प्रशासनाने केली नाही. तसेच स्वच्छतागृहची व्यवस्थादेखील नाही. येथे रात्री उशिरापर्यंत थांबून गाड्या सोडाव्या लागतात, मात्र तेथे दिव्यांची व्यवस्थाही केली नाही. गोदाम कर्मचाऱ्यांकडून निरीक्षकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे संघटनेचे सरचिटणीस विनायक निकम यांनी सांगितले.  

... तर सहकार्याची अपेक्षा करू नका
या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर आदी बाबी खात्याने पुरविल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष गोदामांमधील व्यवस्था अत्यंत दयनीय आहे. या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करता यावे यासाठी गोदामांमध्ये कार्यालयासाठी वेगळी जागा, निदान टेबल-खुर्च्या व रात्रीसाठी दिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा अशा अपमानास्पद स्थितीत काम करताना शिधावाटप यंत्रणेतील कर्मचारी-अधिकारी यांच्याकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा करू नये, असा गंभीर इशारा भोसले आणि निकम यांनी दिला आहे.

Without ration staff facilities Unions warn not to cooperate


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com