नाल्यात पडून युवतीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

ओशिवरा येथे दुर्घटना; साडेसात तासांनी मृतदेह सापडला

मुंबई : गोरेगाव पश्‍चिम परिसरातील ओशिवरा येथे मंगळवारी (ता. १८) सायंकाळी उघड्या नाल्यात (ओशिवरा नदी) पडून एका युवतीचा मृत्यू झाला. कोमल जयराम मंडल (१९) असे मृत तरुणीचे नाव असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. अग्निशमन दलातील जवानांनी साडेसात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. या दुर्घटनेमुळे उघड्या नाल्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शाहरुखची मुलगी सुहाना बद्दल करण जोहर म्हणतोय, "कृपया 'त्या' अफवा आता थांबवा..."

ओशिवरा येथील मेगा मॉलच्या मागील बाजूने चालताना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कोमल मंडल ही तरुणी उघड्या नाल्यात पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नाल्यात रात्रभर राबवलेल्या शोधमोहिमेनंतर बुधवारी (ता. १९) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तिला नाल्यातून बाहेर काढण्यात आले. तिला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

"कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

या संदर्भात महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने काम सुरू असल्यास महापालिकेवर विश्‍वास कोण ठेवणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. ओशिवरा येथे नाल्यात पडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणीच्या पालकांना महापालिकेने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कर्नाळा सहकारी बँक घोटाळा; विवेक पाटलांसह ७६ जणांवर गुन्हा दाखल ...

दुर्घटना थांबत नाहीत...
महापालिका प्रशासन नाल्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते; तरी नागरिकांचे बळी जाण्याचे सत्र थांबलेले नाही. मागील वर्षी जुलैमध्ये मालाड येथील उघड्या गटारात पडलेल्या तीन वर्षांच्या दिव्यांश सिंह याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यावरून महापालिका प्रशासन आणि तत्कालीन महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर धारावीत सात वर्षांचा अमित जैस्वार नाल्यात पडून मृत्युमुखी पडला. वरळी कोस्टल रोडच्या खड्ड्यात पडून बबलू कुमार या १२ वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यावरूनही महापालिका आरोपीच्या पिंजऱ्यात उभी होती.

Young woman dies in a drain

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young woman dies in a drain