

मुंब्रा : मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणावर महाराष्ट्रातच कान पकडून माफी मागण्याची वेळ आली. यामुळं महाराष्ट्रात सध्या हे काय सुरु आहे? असा सवाल आता विचारला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं त्याचे तीव्र पडसाद उमटले असून मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त होत आहे.