नांदेडला सोमवारी २१५ कोरोनाबाधित

चार जणांचा मृत्यू; दोन हजार ४०९ रुग्णांवर उपचार सुरु
Corona
Corona sakal

नांदेड : जिल्ह्यात सोमवारी (ता. ३१) प्राप्त एक हजार २०३ अहवालापैकी २१५ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या एक लाख एक हजार ४९५ एवढी झाली असून यातील ९६ हजार ४१५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजच्या घडीला दोन हजार ४०९ रुग्ण उपचार घेत असून यात तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. रविवारी (ता. ३० जानेवारी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे खडकपुरा नांदेड येथील ८५ वर्षाचा पुरुष, वसमत येथील ७० वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे उमरखेड येथील ७७ वर्षाचा पुरुष तर खासगी रुग्णालयात हाऊसींग सोसायटी नांदेड येथील ८२ वर्षाच्या एका पुरुष असे एकूण चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Corona
Budget 2022 : पेगॅसिसवर स्वतंत्र चर्चेला वावच नाही - Govt

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६७१ एवढी आहे.आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका हद्दीत ११०, नांदेड ग्रामीण १०, बिलोली एक, भोकर एक, धर्माबाद एक, हिमायतनगर एक, हदगाव तीन, कंधार पाच, किनवट ५६, लोहा चार, मुदखेड तीन, मुखेड एक, नायगाव दोन, उमरी चार, परभणी नऊ, हिंगोली दोन, निजामाबाद एक, वाशीम एक असे एकुण २१५ कोरोनाबाधित आढळले आहेत. सोमवारी जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात ८५, खासगी रुग्णालय सात, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणात २४२ असे एकुण ३३४ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुटी देण्यात आली.

Corona
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरीत ३६, किनवट कोविड रुग्णालयात चार, जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण एक हजार २८१, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरण एक हजार ५६, खासगी रुग्णालय ३२ असे एकुण दोन हजार ४०९ व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण बाधित : एक लाख एक हजार ४९५

  • एकूण बरे : ९६ हजार ४१५

  • एकूण मृत्यू : दोन हजार ६७१

  • सोमवारी बाधित : २१५

  • सोमवारी बरे : ३३४

  • सोमवारी मृत्यू : चार

  • उपचार सुरू : दोन हजार ४०९

  • अतिगंभीर प्रकृती : तीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com