esakal | एलपीजी डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून 42 लाखाला गंडा, कुठे ते वाचा...?

बोलून बातमी शोधा

file photo

पंचायत समितीच्या एका सदस्याला एलपीजी डीलरशिप   देण्याचे आमिष दाखवून 42 लाख तीस हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एलपीजी डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून 42 लाखाला गंडा, कुठे ते वाचा...?
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : एलपीजी भारत सरकार हिंदुस्तान पेट्रोलियमचे बनावट कागदपत्र तयार करून लोहा पंचायत समितीच्या एका सदस्याला एलपीजी डीलरशिप   देण्याचे आमिष दाखवून 42 लाख तीस हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या पंचायत समिती सदस्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शेवडी बाजार (ता. लोहा) येथील पंचायत समिती सदस्य कैलास मोहनाजी जाकापुरे हल्ली मुक्काम शिवाजीनगर, नांदेड यांनी फेसबुकद्वारे एलपीजी भारत सरकारच्या हिंदुस्तान पेट्रोलियमच्या बनावट अकाउंटवर असलेल्या संदीपकुमार नावाच्या व्यक्तीची ओळख   पाडली. काही दिवस या दोघांनी एकमेकांशी फेसबुकद्वारे संवाद साधला. यादरम्यान संदीपकुमार याने तुम्हाला गॅस एजन्सी पाहिजे का असे विचारले. यावेळी गॅस एजन्सीला किती खर्च येईल असे विचारले. यावेळी तुम्हाला काय करायचे मी आहो ना, असे म्हणून कैलास जाकापूरे यांचा विश्वास संपादन केला. 

हेही वाचाविशेष स्टोरी : रक्ताच्या पलीकडील नाते कोणते ते वाचा...?

हिंदुस्तान पेट्रोलीयम कंपनीचे बनावट कागदपत्र बनवून 

ता. 11 जून 2020 ते ता. 14 जुलै 2020 च्या दरम्यान कैलास जाकापुरे यांना एलपीजी गॅस वितरक डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 42 लाख 30 हजार चारशे रुपये आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यात जमा करून घेतले. गॅसची डीलरशिप मिळत असल्याने श्री जाकापुरे यांनीही त्यांनी      सांगितलेल्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले. हिंदुस्तान पेट्रोलीयम कंपनीचे बनावट कागदपत्र बनवून कैलास जाकापुरे यांना पाठवून दिले.    व त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बँकांद्वारे पैसे मागून घेतले. आलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे पंचायत समिती सदस्य श्री    जाकापुरे यांच्या लक्षात आले.

फसवणुकीचा गुन्हा दाखल केला 

यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीचे फेसबुकवर बनावट खाते असल्याचेही पोलिस चौकशीमध्ये निष्पन्न झाले. यानंतर मात्र श्री जाकापुरे यांना चांगलाच घाम फुटला. यानंतर कैलास मोहनाजी जाकापूरे  यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली. यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार संदीपकुमारसह त्याच्या इतर साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे हे करत असून एका जबाबदार पंचायत समिती सदस्याला सोशल माध्यमाद्वारे जर फटका बसत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी सोशल माध्यमाचा वापर सांभाळून करावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. एलपीजी डीलरशिप देण्याच्या नावाखाली नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच सर्वात मोठी फसवणूक   असल्याचे बोलल्या जात आहे.