अनलॉकमध्ये दुचाकी चोर सक्रीय; दररोज चार ते पाच गुन्हे होताहेत दाखल

शनिवारी (ता. १२) जिल्ह्यातील विविध ठाण्यांमध्ये सहा दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हा दाखल झाले आहेत.
नांदेडमध्ये दुचाकी चोरांचा हैदोस
नांदेडमध्ये दुचाकी चोरांचा हैदोस

नांदेड ः लॉकडाउनमध्ये दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र, अनलॉक झाल्यानंतर दुचाकी चोर पुन्हा सक्रीय झाल्याचे दररोजच्या गुन्ह्यांवरुन सिद्ध होत आहे. शनिवारी (ता. १२) जिल्ह्यातील विविध ठाण्यांमध्ये सहा दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हा दाखल झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यात मात्र पोलिस अपयशी ठरत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

गजानन देवन्ना मठ्ठावार (रा. एसव्हीएम कॉलनी, किनवट) यांची दुचाकी (एमएच-२६, यु-६९५९) एसबीआय बॅंक किनवट येथून चोरीला गेली आहे. किनवट ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तसेच मोहम्मद अब्दुल राफे ऐजाज मोहम्मद अब्दुल सत्तार (रा. विसावानगर नांदेड) यांची दुचाकी (एमएच-२६, एम-३६७४) हैदरबाग रोड देगलूर नाका येथून चोरीला गेली असून, इतवारा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद आहे.

हेही वाचा - पोलिसांनी घटनास्थळावरुन ४० हजार रोख व सहा दुचाकी, जुगाराचे साहित्य असा एक लाख ९० हजाराचा ऐवज जप्त केला.

व्यंकटराव माणिकराव हंबर्डे (रा. काळेश्वरनगर, विष्णुपुरी) यांची दुचाकी (एमएच-२६, वाय-५८१४) वाडीपाटी ते मातोश्रीकडे जाणाऱ्या रोडवरुन चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तसेच भारत दत्तात्रय रावते (रा. ढाकणी, ता.उमरखेड) यांची दुचाकी (एमएच-२९, एएल-४७४४) माहूर येथील वसमतकर महाराज यांच्या मठासमोरुन चोरीला गेली असून, माहुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. शिवाय विमानतळ पोलिस ठाण्यामध्येही दोन दुचाकी चोरी गेल्याचे गुन्हे दाखल आहे. विश्वदीप वसंतराव जाधव (रा. आंबेकरनगर, नांदेड) यांची दुचाकी (एमएच-१३, बीयु-७१२०) घरासमोरुन चोरीला गेली आहे. तसेच शिवनगर येथील शोभाबाई नंदकिशोर दुबे यांचीही दुचाकी (एमएच-१३, बीयु-७१२०) घरासमोरुन चोरीला गेली आहे.

येथे क्लिक करा - नांदेड शहराच्या शिवाजीनगर, इतवारा, विमानतळ या ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी व दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या

जिल्ह्यात विवाहिता छळाचे चार गुन्हे दाखल

नांदेड ः कोळगाव (ता. बिलोली) येथील २२ वर्षीय विवाहितेचा माहेरहून अॅटो घेण्यासाठी एक लाख रुपये घेवून येण्यासाठी छळ केला जात होता. त्याला कंटाळून विवाहितेने माहेरी येवून दिलेल्या तक्रारीवरुन उमरी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

माहेरी लादगा (ता.मुखेड) येथेही २४ वर्षिय विवाहितेचा ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ होत होता. त्याला कंटाळून इकबालनगर येथे माहेरी येऊन दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. शिवाय विष्णुनगर येथे २५ वर्षिय विवाहितेचा नवीन होलसेल मेडिकल दुकान टाकण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण व मानसिक छळ केला जात होता. सदर विवाहितेच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद आहे. गोविंदनगर नांदेड येथेही २५ वर्षिय विवाहितेचा माहेरहून कार घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी होत होती. त्याला कंटाळून विवाहितेने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, सासरकडील मंडळींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com