Corana update:नांदेड जिल्ह्यात आजघडीला २७१ रुग्णांवर उपचार

जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा कोरोना अपडेट
नांदेड जिल्हा कोरोना अपडेट

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या एक हजार 632 अहवालापैकी 34 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 21 तर अँटिजेन तपासणीद्वारे 13 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 115 एवढी झाली असून यातील 88 हजार 367 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 271 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 901 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 7, देगलूर तालुक्यांतर्गत 1, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 2, धर्माबाद 1, परभणी 1, अर्धापूर 2, कंधार 1, बिलोली 1, लोहा 4 तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, नायगाव 1, नांदेड 3, हिंगोली 2, बिलोली 1, किनवट 1 असे एकूण 34 बाधित आढळले.

हेही वाचा - 'फादर्स डे'च्या दिवशी वडिलांचं छत्र हरवलं

रविवार (ता. २०) जिल्ह्यातील 39 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 1, मुखेड कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 1, किनवट कोविड रुग्णालय 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 25, खाजगी रुग्णालयातील 8 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

रविवारी ( ता. २० ) 271 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 21, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 3, किनवट कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 4, हदगाव कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 172, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 41, खाजगी रुग्णालय 12 व्यक्ती उपचार घेत आहेत.

येथे क्लिक करा - मोक्कातील दोघांसह तिघांना अटक व कोठडी; सव्वादोन लाखाचा ऐवज जप्त- नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जिल्ह्याचा कोरोना मिटर

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 89 हजार 824

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 87 हजार 198

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 115

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 367

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 901

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.98 टक्के

रविवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

रविवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

रविवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-154

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-271

रविवारी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com