Nanded News
Nanded Newsesakal

Nanded : अर्धापुरात शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोठा मोर्चा

या मोर्चात महिला व बालकांसह हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.

अर्धापूर (जि.नांदेड) : कोंढा (ता.अर्धापूर) येथील कृषीपंपाचा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीने थकित वीजबील वसुलीसाठी वीजपुरवठा (Electricity) खंडित केल्यामुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तसेच पिकांना पाणी मिळत नसल्याने पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महावितरण कंपनीने कोंढा येथील शेतीची विज सुरू करावी. गुरुवारी (ता.३०) या मागणीसाठी गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर (Nanded) बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात महिला व बालकांसह हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. हा मोर्चा कोंढा येथून वाजत-गाजत काढण्यात आला. अर्धापूर (Ardhapur) शहरातील प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा गेल्याने शहरात कुतुहलाचा विषय झाला. (Farmers March On Mahavitaran Office In Ardhapur Taluka Of Nanded)

Nanded News
Aurangabad : लग्नाहून परतणाऱ्या वाहनाचा अपघात; ६ जण जागीच ठार, १४ जखमी

कोंढा येथील शेतीची वीज पुरवठा गेल्या काही वर्षांत खंडित करण्यात आला आहे. हा विज पुरवठा सूरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी निवेदन ही देण्यात आले होते. हा खंडित करण्यात आलेला विज पूरवठा सुरू करण्यात आला. यासाठी उपविभागीय सहायक अभियंता यांच्याकडे प्रति शेतकरी २० हजार रूपये या प्रमाणे विज बील भरणा करण्यासाठी सर्व शेतकरी गेले असता त्यांनी पैसे स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत पैसे परत केले. गावच्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागास आदेशीत करावे, अशी मागणी करण्यात आली होती. पण कोणीही गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे गुरुवारी कोंढा येथील शेतकऱ्यांनी बैलगाडी, ट्रॅक्टरसह मोर्चा काढला.

Nanded News
Aurangabad Accident : पैठणमध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

या मोर्चात महिला व बालकासह हजारो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला. या मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आमच्या जनावरांची, आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा अशी मागणी करत महावितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या मांडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com