शेतकऱ्यांसाठी खुशखबर...नांदेडला यंदा रब्बीचा हंगाम चांगला!

अभय कुळकजाईकर
Monday, 7 September 2020

नांदेड जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बीचा हंगाम चांगला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. पाणीसाठा लक्षात घेऊन कृषि विभागाकडूनही नियोजन करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी रब्बी हंगामात तीन लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. 

नांदेड - नांदेड जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ अपेक्षीत आहे. धरण साठ्याची चांगली स्थिती पाहता कृषी विभागाकडून तीन लाख हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यात सर्वाधीक दोन लाख हेक्टरवर हरभरा, एकेचाळीस हजार हेक्टरवर गहू तर चाळीस हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीचा पेरा प्रस्तावित केला आहे. 

जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बीचा हंगाम चांगला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. पाणीसाठा लक्षात घेऊन कृषि विभागाकडूनही नियोजन करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी रब्बी हंगामात तीन लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. 

हेही वाचा - भाच्याचा मृत्यू सहन झाला नसल्याने शंकर- पार्वती देवाघरी, कुठे ते वाचा...?

रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ 
नांदेड जिल्ह्यातील रब्बी हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ३६ हजार हेक्टर आहे. यात मागील काही काळात वाढ होत आहे. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा तसेच जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर प्रकल्पातील पाणी पाळ्या मिळत असल्याने पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७५ हजार ६४६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यात सार्वधीक एक लाख ९० हजार हेक्टरवर हरभराची पेरणी झाली होती. तर चाळीस हजार हेक्टरवर गहू व ३४ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती. यंदा यात कृषी विभागाकडून वाढ व्यक्त केली आहे. 

तीन लाख हेक्टरवर पेरणीची शक्यता
जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात तीन लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात दोन लाख हेक्टरवर हरभरा, ४१ हजार ६६६ हेक्टरवर गहू, ४० हजार हेक्टरवर रब्बी ज्वारी, पाच हजार २५० हेक्टरवर रब्बी मका, करडइ तीन हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावीत केली आहे. शेतकर्यांना लागनाणार्या रासायणीक खताची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करर्यात येणार आहे. खरीपातील शिल्लक खतं तसेच मंजूर होनार्या आवंटनामुळे खताची कमतरता पडणार नाही अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

हेही वाचलेच पाहिजे - आठवड्याभरानंतरही नांदेडला दिलासा नाहीच, रविवारी ३२८ जण पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

आगामी रब्बीसाठी प्रस्तावीत क्षेत्र 
(क्षेत्र हेक्टरमध्ये)

  • पीक..........सर्वसाधारण क्षेत्र...........प्रस्तावित क्षेत्र
  • हरभरा...........६२,३४९.................२,००,०००
  • गहू...............३८,५३८...................४१,६६६
  • रब्बी ज्वारी......२६,९७५...................४०,०००
  • रब्बी मका.........३,१७८.....................५,२५०
  • करडइ..............४,७६८.....................३,०००

रब्बीचा पेरा वाढेल
यंदा नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात तसेच जिल्ह्यानजीकच्या प्रकल्पात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत रब्बीचा पेरा वाढेल.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for farmers ... Rabbi season is good for Nanded this year!, Nanded news