वर्क फ्राॅम होम करताय, तर ही घ्या दक्षता

फोटो
फोटो

नांदेड : कोविड- 19 विषाणुने जगभर थैमान घातल्यामुळे त्याचे जागतीक घटकांवर दुरगामी परिणाम होणार आहेत. लाॅकडाऊन कालावधी वाढतच असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचे स्वरुप बदलणार आहे. बऱ्याच कंपन्या, शैक्षणीक संस्था, शासकीय कार्यालये जास्तीत जास्त आॅनलाईन कामकाजावर भर देत असल्यामुळे "वर्क फ्राॅम होम" काळाची गरज बनली आहे.

त्यामुळे वर्क फ्राॅम होम करत असताना सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात न सापडता सुरक्षित पद्धतीने कामकाज पार पाडावे लागणार आहेत. आता भारतातील बहुतेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरातुन, होम नेटवर्क वापरताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे अनिवार्य आहेत.

वर्क फ्राॅम होमचे स्वरुप

ँ आॅनलाईन शिक्षणव्यवस्था
ँ आय टी कंपन्या 
ँ शासकीय कार्यालये 
ँ बँकिग व्यवस्था
ँ आऊटसोर्सिंग कंपन्या

वर्क फ्राॅम होम करताना वापरण्यात येणारे टुल्स /तंत्रज्ञान

ँ VPN 
ँ क्लाऊड तंत्रज्ञान
ँ ब्राॅड ब्रॅन्ड कनेक्टीव्हीटी
ँ Wi-Fi नेटवर्क
ँ V M ware / रिमोट अॅक्सेस
ँ अद्यावत संगणक व कौशल्ये
ँ बॅक अप सर्व्हर,गुगल ड्राईव्ह इ.

वर्क फ्राॅम होमचे फायदे

ँ वेळेची बचत
ँ कमी मनुष्यबळ
ँ वेगवान काम
ँ अचुकता,अधिक उत्पादनक्षमता
ँ निरंतरपणे काम करण्याचे कौशल्य

वर्क फ्राॅम होमचे तोटे /सायबर रिस्क
 
डेटा लाॅस, डेटा ब्रिचींग हॅकिंग, रॅन्समवेअर, मालवेअर अटॅक, फिशींग, स्निफींग, स्पायवेअर, क्रेडीट डेबिट कार्ड विषयी आर्थिक गुन्हे

वर्क फ्राॅम होम करताना घ्यावयाची दक्षता

ँ आपल्या घरातील वायफाय नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी व्हीपीएन वापरा. हे आपल्याला हॅकर्सपासून आपल्या कंपनीचे संवेदनशील कागदजत्र सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. बर्‍याच कंपन्यांनी व्हीपीएन स्थापित करण्यासाठी आपल्या कर्मचार्‍यांना मदत केली आहे. सर्वात सुरक्षित व्हीपीएन शोधा आणि डाऊनलोड करुन घ्या.

आपल्या डाटा गोपनीयतेचे रक्षण करा.

ँ काही कार्यालयांनी कर्मचार्‍यांच्या घरी वर्क डेस्कटॉप बसवले आहेत. परंतु आपण कामासाठी आपला स्वतःचा वैयक्तिक संगणक वापरत असल्यास, आपण एक स्वतंत्र फोल्डर उघडणे आवश्यक आहे आणि केवळ त्या ठिकाणी फायली जतन (सेव्ह)करणे आवश्यक आहे. जर आपल्या ऑफिसच्या आयटी विभागास आपल्या सिस्टममध्ये रिमोट लाॅगीनला परवानगी असेल तर केवळ आपणास लागणारे महत्तवाचे फोल्डर  अॅक्सेस व्हावे अशी परमिशन सेटींग एनेबल करुन आपल्या डाटा गोपनीयतेचे रक्षण करा.

स्वतंत्र ब्राउझर वापरा

ँ वैयक्तिक वापरासाठी स्वतंत्र ब्राउझर वापरा. वैयक्तिक ब्राउझिंगसाठी कधीही वर्क ब्राउझर वापरू नका. एकदा आपण ऑफिसवर परत आल्यावर ऑटोफिल बारमध्ये माहिती आपोआप येत असल्यामुळे सर्चिंग करणे टाळतो. सर्व ब्राउझिंग हिस्र्टी, ऑटोफिल फॉर्म आणि कुकीज दररोज लाॅग आऊट होण्यापूर्वी डिलीट करा.तसेच वेळोवेळी बॅकअप घेत चला. कनेक्टीव्ही किंवा इतर कारणांमुळे डेटा लाॅस होणार नाही.  

वैयक्तिक सोशल मीडिया खाती वापरू नका

ँ याची खात्री करुन घ्या की आपण कार्यालयात असताना सर्व डेटा-हँडलिंग प्रोटोकॉलचे पालन करीत आहात, जसे की डाॅक्युमेंन्टस कुठे सेव्ह करावे. वैयक्तिक जीमेल ड्राइव्ह किंवा ड्रापबाॅक्स वापरल्यामुळे डेटा गळती आपण थांबवु शकतो.
ँ आपल्या नोकरीमध्ये आपल्या कंपनीसाठी सोशल मीडिया व्यवस्थापित करणे समाविष्ट असल्यास, कार्य करताना वैयक्तिक सोशल मीडिया खाती वापरू नका. आवश्यक असल्यास आपल्या वैयक्तिक सोशल मीडियाचा वापर भिन्न ब्राउझरवर करा.

दूर जात असला तरीही आपला संगणक लॉक करा

ँ वर्क फ्राॅम होम करत असताना आपण वापरत असलेल्या संगणकापासुन फक्त एका मिनिटासाठी जरी दूर जात असला तरीही आपला संगणक लॉक करा. जर आजुबाजु असलेल्या एखाद्या व्यक्तीने चुकीचे बटण दाबल्यामुळे आणि काही महत्त्वाची फाईल डिलीट होऊ शकते किंवा आपल्या नेटवर्क अॅडमीनसह रिमोट अॅक्सेस किंवा आपले कनेक्शन डिसेबल केले तर डेटा लाॅस होऊ शकतो.

वर्क फ्राॅम होमच्या स्वरुपाविषयी चर्चा करु नका.

ँ वर्क फ्राॅम होम करतेवेळी जर आपण सोशल मीडिया वापरत असताल तर जी माहिती आपण सोशल मिडीया अंकाऊटवर पोस्ट किंवा शेअर करणार आहोत त्याबद्दल   खूप काळजी घ्या. कारण अनाहुत पणे एखादी आॅफीशिअल ईन्फाॅर्मेश्न लिक किंवा शेअर होऊ शकते. आपल्या घरातील व्यक्तींसोबत, मित्रांसोबत आपल्या कामाबद्दल काहीही उघड किंवा शेअर करु नका कारण आपल्या संवेदनशील अधिकृत फायलींच्या डेटा सुरक्षिततेशी तडजोड होऊ शकते. तसेच सार्वजनिक ठिकाणी आपल्या वर्क फ्राॅम होमच्या स्वरुपाविषयी चर्चा करु नका.

वर्क स्टेशनची छायाचित्रे कधीही सोशल मीडियावर पोस्ट करू नका

ँ आपल्या घरातील वर्क स्टेशनची छायाचित्रे कधीही सोशल मीडियावर पोस्ट करू नका. आपल्या कंपनीच्या गोपनीय फायलींकडे डोकावण्याचा प्रयत्न करीत असलेले हॅकर्स किंवा प्रतिस्पर्धींकडून आपण आॅफीशिअल व्यवसायिकता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी काय तंत्रज्ञान वापरले, इंटरनेटवर काय सर्च केले यावर नजर असु शकते याबाबत आपल्याला कधीच माहिती नसते.

स्वतंत्र ब्राऊझर किंवा डेस्कटाॅप वापरा

ँ आपण आपल्या जोडीदारासोबत  वेगवेगळ्या  शिफ्टमध्ये काम करू शकत असला तरीही आपण आपली संगणक प्रणाली सामायिक करू नये, जेणेकरून महत्त्वाच्या फाइल्स डिलीट होऊ शकतात.
ँ आॅफीशिअर सिस्टमवर कार्य करताना वैयक्तीक वापरासाठी स्वतंत्र ब्राऊझर किंवा डेस्कटाॅप वापरा. वेगवेगळे आॅपरेटिंग सिस्टीमचा पर्याय आपण यावेळी निवडु शकता. आॅफीशिअर वर्क डेस्कटॉप वापरताना शक्यतो वैयक्तीक काम करु नये.
आवेज मक्सुद काझी, पोलीस उपनिरीक्षक, ट्रायल माॅनिटरिंग सेल, लातुर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com