esakal | नांदेडमध्ये बारावीचा निकाल 99.73 टक्के! लातूर विभागात अव्वल
sakal

बोलून बातमी शोधा

File

नांदेड जिल्ह्याचा ९९.७३ टक्के इतका निकाल लागला असून, दहा तालुक्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

नांदेडमध्ये बारावीचा निकाल 99.73 टक्के! लातूर विभागात अव्वल

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२१ मध्ये बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंगळवारी (ता. तीन) ऑनलाइन जाहीर झाला आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा ९९.७३ टक्के इतका निकाल लागला असून, दहा तालुक्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात दोन महिन्यांत ६८ टक्के पाऊस, माहूरला कमी नोंद

लातूर विभागातून नांदेड जिल्ह्याचा निकाल अव्वल आहे. शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये आयोजित केलेली बारावीची परीक्षा राज्य सरकारच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा निकाल मंगळवारी जाहीर केला. २०२१ मधील बारावीच्या परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाने तयार केलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात आली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध असणार असल्याचे मंडळातर्फे कळविले आहे.

हेही वाचा: राज्यपाल कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

सुधारीत मुल्यमापन कार्यपद्धतीनुसार मंगळवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, लोहा, मुदखेड आणि उमरी या दहा तालुक्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. २०२१ मध्ये जिल्ह्यातून ३२ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी (मुले - १७ हजार ८७३ आणि मुली - १४ हजार ७२०) नोंदणी केली होती. त्यापैकी ३२ हजार ५०५ विद्यार्थी (मुले - १७ हजार ८२३, मुली - १४ हजार ६८२) उत्तीर्ण झाले असून ८८ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत.

हेही वाचा: नांदेड जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या

बारावीच्या निकालातही वेबसाईटचा गोंधळ

काही दिवसापूर्वी दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना तब्बल सहा ते सात तासानंतर निकाल उशीरा प्राप्त झाला. त्याचीच पुनरावृत्ती बारावीच्या निकालातही मंगळवारी बघायला मिळाली. वेबसाईट न उघडणे, हॅक होणे आदी प्रकार घडत असल्याने वेबसाईटच्या सावळ्या गोंधळामुळे निकालासाठी विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले. विद्यार्थ्यांना रात्री उशीरापर्यंत निकाल पाहण्यासाठी ताटकळत बसावे लागले होते.

हेही वाचा: 'चुकीच्या माहितीमुळे नांदेड जिल्हा परिषदेची बदनामी'

मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे. त्यासाठी दहावीपासूनच मी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले होते. रात्र-दिवस अभ्यास करूनही लेखी परीक्षा झाली नसल्याने हुशार मुलांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

- वेदांत सिद्धेश्वर स्वामी, विद्यार्थी.

हेही वाचा: Nanded : नांदेड जिल्ह्यातील धरणांमध्ये ६२ टक्के पाणीसाठा

तालुकानिहाय निकाल

--------------------------------

तालुका --- प्रविष्ट परीक्षार्थी ---- उत्तीर्ण ---- टक्केवारी

--------------------------------

नांदेड - ८२५४ - ८२१२ - ९९.४९

अर्धापूर - ९२० - ९२० - १००

भोकर - १०७० - १०६९ - ९९.९०

बिलोली - १०३४ - १०३४ - १००

देगलूर - १९६७ - १९५७ - ९९.४९

धर्माबाद - ७२५ - ७२५ - १००

हदगाव - १४४४ - १४४२ - ९९.८६

हिमायतनगर - ६३५ - ६३५ - १००

कंधार - ४१५४ - ४१४७ - ९९.८३

किनवट - २२३२ - २२२९ - ९९.८६

लोहा - १६८० - १६८० - १००

माहूर - ७६१ - ७५७ - ९९.४७

मुखेड - ३३२४ - ३३०७ - ९९.४८

मुदखेड - ७२४ - ७२४ - १००

नायगाव - २७८४ - २७८२ - ९९.९२

उमरी - ८८५ - ८८५ - १००

--------------------

एकूण - ३२,५९३ - ३२,५०५ - ९९.७३

----------------------

loading image
go to top