esakal | जारीकोट शाळेत साहित्याची मोडतोड; दहा दिवसांत दुसऱ्यांदा घडला प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

जारीकोट शाळेत साहित्याची मोडतोड; दहा दिवसांत दुसऱ्यांदा घडला प्रकार

याप्रकरणी शाळेच्या प्रशासनच्या वतीने धर्माबाद पोलिस ठाण्यांमध्ये पूर्वीच गुन्हा नोंद करण्यात आला होता.

जारीकोट शाळेत साहित्याची मोडतोड; दहा दिवसांत दुसऱ्यांदा घडला प्रकार

sakal_logo
By
सुरेश घाळे

धर्माबाद (नांदेड) : तालुक्यातील अत्यंत गौरवशाली समजल्या जाणाऱ्या जारीकोट (Jarikot) येथील जिल्हा परिषद शाळेच्या खिडक्या व दारे तोडून गावगुंडानी अक्षरशः शाळेमध्ये धुडगूस घातला असून शाळेतील साहित्याची मोडतोड केली आहे. (Literature has been destroyed in Jarikot school in Dharmabad taluka)

हेही वाचा: धर्माबाद परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी शाळेच्या प्रशासनच्या वतीने धर्माबाद पोलिस ठाण्यांमध्ये पूर्वीच गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु पुन्हा नंतर दहा दिवसानंतर हाच प्रकार शाळेतल्या वर्गखोल्याचे कुलूप तोडून शाळेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची, सामानांची नासधुस करण्याचा प्रकार पुन्हा एकदा जारीकोटच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घडल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील अत्यंत महत्त्वाचे असणारी कागदपत्रे सुरक्षित आहेत की नाहीत व ती सुरक्षित रहावे यासाठी गावकऱ्यांचे व पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेला आहे.

हेही वाचा: धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा; रामचंद्र बन्नाळीकर बिनविरोध

जिल्हा परिषद शाळेमधून अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात आपल्या गावचा व आपल्या शाळेचे नाव उज्वल करीत असताना दुसरीकडे मात्र काही समाजकंटकांनी गेल्या दहा पंधरा दिवसापासून जारीकोटच्या जिल्हा परिषद शाळेच्या खोलीची दारे व खिडक्या तोडून आतमध्ये धुडगूस घालत आहेत. याप्रकरणी शाळेच्या वतीने धर्माबाद पोलिस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार देण्यात आली होती. परंतु या तक्रारीच्या अनुषंगाने कुठलीही ठोस अशी कारवाई झाली नाही. त्यामुळे या गावगुंडाचे मनोबल वाढतच चालले आहेत.

हेही वाचा: धर्माबाद तालुक्यात ३१ हजार ब्रास गाळ उपसा

त्यानंतर परत एकदा आठ ते दहा दिवसानंतर असाच प्रकार पुन्हा शाळेमध्ये घडल्यामुळे मात्र विद्यार्थी व गावातील नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. याप्रकरणी धर्माबाद पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जिल्हा परिषद शाळेची नासधूस करणाऱ्या विरुद्ध शोध मोहीम राबवावी व असा प्रकार पुन्हा घडू नये अशी अपेक्षा गावकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. (Literature has been destroyed in Jarikot school in Dharmabad taluka)

loading image