esakal | लॉकडाउन : नांदेडवरुन तीन विशेष रेल्वेने साडेचार हजार परप्रांतीय मायभूमीत 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हजारो उत्तर भारतीय कामगार नांदेडस परभणी, हिंगोली आणि लातूर  जिल्ह्याच्या विविध भागात वास्तव्यास होते. मात्र लॉकडाउनमध्ये त्यांच्या हातचे काम गेले आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जिल्हा प्रशासनाने त्यांची व्यवस्था मंगल कार्यालय व काही कॅम्पमध्ये केली होती

लॉकडाउन : नांदेडवरुन तीन विशेष रेल्वेने साडेचार हजार परप्रांतीय मायभूमीत 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड -  पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम व आपल्या कौशल्यातून कुटुंबाची व स्वत:ची उपजिविका करणारे हजारो उत्तर भारतीय कामगार नांदेडस परभणी, हिंगोली आणि लातूर  जिल्ह्याच्या विविध भागात वास्तव्यास होते. मात्र लॉकडाउनमध्ये त्यांच्या हातचे काम गेले आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जिल्हा प्रशासनाने त्यांची व्यवस्था मंगल कार्यालय व काही कॅम्पमध्ये केली होती. या सर्व कामगारांना तिन विशेष रेल्वेने जवळपास साडेचार हजार परप्रांतीयांना त्यांच्या मायभूमीत पाठविले. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरात लॉकडाउन सुरू आहे. देशातही लॉकडाउन सुरू केल्याने हजारो परप्रांतीय कामगार, मजुर नांदेड व शेजारील जिल्ह्यात अडकून पडले होते. या सर्व कामगारांना धीर देत प्रशासनाने त्या- त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची तयारी केली. सुरूवातीला नांदेडहून उत्तरप्रदेश (गोरखपूर) त्यानंतर बिहार आणि शुक्रवारी (ता. २९) पश्‍चिम बंगालसाठी रेल्वे सोडली. या तिन्ही रेल्वेद्वारे जवळपास साडेचार हजार परप्रांतीय कामागार आपल्या मायभूमीत पोहचले.

हेही वाचा - जिल्ह्यात काल पाच पॉझिटिव्ह, नऊ जणांचे दुसरे रिपोर्ट निगेटिव्ह
 

बिहार व पश्‍चिम बंगालकडे रवाना

बिहार राज्यातील अडकलेल्या कामगारांना विशेष श्रमीक रेल्वेने त्यांची बिहारकडे रवाना केले. या गाडीला अरारीया, खगारीया आणि गया येथे धांबे देण्यात आले होते. चौथा लॉकडाउन सुरु झाल्याने बिहारमधील जवळपास एक हजार २३ कामगारांना त्यांच्या मुळ गावी पाठवायचा निर्णय घेऊन त्यांना सोमवारी (ता. २५) दुपारी श्रमीक रेल्वेने हजुर साहिब नांदेडहून बिहारकडे रवाना करण्यात आले. मायभूमीत जाण्यासाठी आतूर झालेल्या कामगारांनी रात्रीपासूनच रेल्वेस्थानक परिसरात गर्दी केली होती. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाला करावी लागली कसरत 

कोरोना या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्या संबंधाने भारतातही चौथे लॉकडाउन सुरू झाले आहे. आता १८ मेपासून लॉकडाउनचा चौथा टप्पा असल्याने परप्रांतीय कामागार व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र या नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे. परप्रांतीय कामगारांना कुठलीच अडचण येणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली असून त्यांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बिहारमधील एक हजार २३ कामगार जिल्ह्याच्या विविध भागात कामाला होते. त्यात महिला, लहान बालकांचा समावेश होता. काहींचे तर अख्खे कुटुंबच पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते.

हे देखील वाचाच - ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करा, अन्यथा कारवाई......कोण म्हणाले ते वाचा

साडेचार हजार परप्रांतीय रेल्वेने रवाना 

यासोबतच ता. २९ मे रोजी पश्‍चिम बंगालच्या जवळपास दीड हजार कामगारांना श्रमीक रेल्वेने रवाना केले. हे कामगार आपल्या मायभूमीत पोहचल्यानंतर भविष्यात नांदेड व इतर जिल्ह्यात कामाला येणार की नाही याबाबद साशंकता व्यक्त होत होती. शुक्रवारी पाठविलेल्या कामगारांमध्ये सर्वाधीक सोन्याचे नक्षिकाम करणाऱ्यांचा सहभाग होता. सराफा संघटनेच्या वतीने त्यांना हजूरसाहिब रेल्वे स्थानकावर निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.   

यांची होती उपस्थिती

जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्रसिंग, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांनी या सर्व उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेत होते.