esakal | आमदार बालाजी कल्याणकरांनी केली आयुर्वेदिक महाविद्यालयात पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडला आयुर्वेदिक महाविद्यालयात आमदार बालाजी कल्याणकरांनी केली पाहणी

नांदेडला सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे रुग्णालयात गर्दी होत आहे. यातून रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. वैद्यकीय विभागाकडून रुग्णांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार बालाजी कल्याणकर यांनी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. पुन्हा बुधवारी शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालय येथील कोव्हीड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली.

आमदार बालाजी कल्याणकरांनी केली आयुर्वेदिक महाविद्यालयात पाहणी

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोव्हिड केअर सेंटरची नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी बुधवारी (ता. १६ सष्टेंबर) पाहणी केली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना व लवकरात लवकर रुग्णांसाठी नवीन ६० सुसज्य खाटांची व्यवस्था करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. राजपूत यांना सूचना केल्या.       

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात यावेळी अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील, डॉ. विश्वास गोगटे, डॉ. निसार अली खान, डॉ. उखळकर, डॉ. मंगेश नळकांडे, डॉ. गोपाल जाधव, प्रशासकीय अधिकारी संजय कंदले, कार्यालयीन अधिक्षक सुरजीतसिंग तबेलेवाले यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा - धक्कादायक : नांदेड जिल्ह्यातील ‘हा’ पाझर तलाव फुटून शेकडो हेक्टर शेती गेली खरडून

रुग्णांच्या आल्या होत्या तक्रारी
सध्या सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात गर्दी होत आहे, यातून रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत. वैद्यकीय विभागाकडून देखील रुग्णांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार बालाजी कल्याणकर यांनी दोन दिवसापूर्वीच शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. पुन्हा बुधवारी शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालय येथील कोव्हीड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली. 

मांडल्या अडचणी, समस्या
यावेळी अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील यांनी काही समस्या मांडल्या, सध्या आयुर्वेदिक महाविद्यालयात ४० खाटा असून ५४  रुग्ण उपचार घेत आहेत. त्याबरोबरच शंभर रुग्णांना पाच दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याबरोबरच पुढील पाच दिवसात कोरोना रुग्णांसाठी टप्याटप्याने सुसज्ज ६० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. राजपूत यांनी सांगितले. सध्या त्या ६० खाटांमधील १४ खाटा रुग्णांना देण्यात आल्या आहेत तर उर्वरित ४५ खाटा पुढील पाच दिवसांत तयार करून देणार असल्याची माहिती दिली. सध्या आयुर्वेदिक महाविद्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्याने, पुढील काळात वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्याची मागणीही यावेळी केली. तसेच चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची देखील कमतरता असल्याचे सांगितले. 

हेही वाचलेच पाहिजे - परभणी : कांदा निर्यात धोरणाला जिल्ह्यात विरोध, संघटना, शेतकरी आक्रमक 

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना भेटणार
या बाबत आमदार कल्याणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे समस्या मांडणार असल्याचे सांगितले. त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांना उत्तम आहार द्यावा. त्यांना योग्य मार्गदर्शन करून गरजू रुग्णावर उपचार करण्याच्या सूचना केल्या. तसेच काही रुग्णांच्या स्वच्छतेबाबत तक्रारी आल्या असून लवकरात लवकर स्वच्छता करण्याबाबत त्यांनी सांगितले.