नांदेड कोरोना- आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित 271 रुग्ण

file photo
file photo

नांदेड :- शुक्रवार 4 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 202 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 362 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 94 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 268 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 381 अहवालापैकी  966 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 8  हजार 212 एवढी झाली असून यातील  5  हजार 203 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.85 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 698 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 271 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 257 झाली

या अहवालात आज 6 जणांचा मृत्यू झाला असून मृत्त पावलेले व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 46 वर्षाचा देगलूर येथील एक पुरुष, 61 वर्षाचा विनायकनगर नांदेड येथील एक पुरुष, 70 वर्षाचा विष्णुपुरी नांदेड येथील एक पुरुष, तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नांदेड येथील 72 वर्षाचा एक पुरुष, 50 वर्षाचा किनवट येथील पुरुष तर खाजगी रुग्णालयात गणराज प्लाझा नांदेड येथील 56 वर्षाचा एका पुरुषाचा मृत्तांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 257 झाली आहे.

 202 औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे

 आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 10, मुखेड कोविड केंअर सेंटर 14, हदगाव कोविड केंअर सेंटर 2, लोहा कोविड केंअर सेंटर 10, माहूर कोविड केंअर सेंटर 12, नायगाव कोविड केंअर सेंटर 7, देगलूर कोविड केंअर सेंटर 6, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 23, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर 52, खाजगी रुग्णालय 6, किनवट कोविड केंअर सेंटर 4, मुदखेड कोविड केंअर सेंटर 1, उमरी कोविड केंअर सेंटर 23, कंधार कोविड केंअर सेंटर 26, बिलोली कोविड केंअर सेंटर 4 असे  बाधित व्यक्तींना 202 औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे

नांदेड मनपाक्षेत्र 33, किनवट तालुक्यात 12, भोकर 5, लोहा 4, नायगाव 8, उमरी 5, धर्माबाद 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 3, अर्धापूर 1, हदगाव 4, देगलूर 4, मुखेड 8, हिंगोली 1, हिमायतनगर 3 व परभणी 1 असे एकुण 94 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  

नांदेड मनपा क्षेत्र 132, अर्धापूर तालुक्यात 01,  मुखेड 3, किनवट 4, नायगाव 16, देगलूर 6, धर्माबाद 10, हिमायतनगर 1, हिंगोली 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 23, मुदखेड 4, बिलोली 2, लोहा 11, कंधार 6, हदगाव 12, माहूर 17, उमरी 15, लातूर 9 असे  एकुण 288 बाधित आढळले

येथे उपचार घेत आहेत

जिल्ह्यात 2 हजार 698 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 247, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 1124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 82, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 54, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 85, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 126,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 56, लोहा कोविड केअर सेंटर येथे 113, हदगाव कोविड केअर सेंटर 57, भोकर कोविड केअर सेंटर 27,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 34,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 91, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 34, मुदखेड कोविड केअर सेटर 32,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 53, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 48, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 57, उमरी कोविड केअर सेंटर 38, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 5, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 305 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 17, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 5 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण सर्वेक्षण 1 लाख 52 हजार 613

घेतलेले स्वॅब- 53 हजार 063,

निगेटिव्ह स्वॅब- 42 हजार 658,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 362,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 8 हजार 212,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 24,

एकूण मृत्यू संख्या- 257,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 203,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 698,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 488, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 271. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com