Nanded : सह्याद्रीनगरमध्ये दोन सिलेंडरचा स्फोट होवून पाच दुकानांना आग, सुदैवाने जीवितहानी टळली

नांदेड शहरातील चैतन्यनगर भागात असलेल्या सह्याद्रीनगर येथील एका दुकानाला सोमवारी सकाळी आग लागली. त्यानंतर ही आग वाढत पाच दुकानांपर्यंत गेली. त्यात दोन सिलेंडरचा स्फोट झाला.
nanded
nanded Sakal

Nanded News : शहरातील चैतन्यनगर भागात असलेल्या सह्याद्रीनगर येथील एका दुकानाला सोमवारी (ता. आठ) सकाळी आग लागली. त्यानंतर ही आग वाढत पाच दुकानांपर्यंत गेली. त्यात दोन सिलेंडरचा स्फोट झाला. दरम्यान, अग्निशमन विभागाने घटनास्थळी येऊन आग विझवली त्यामुळे कोणताही जीवीतहानी झाली नाही. मात्र जवळपास दहा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

सोमवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमध्ये पाच दुकानातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. नांदेड शहरातील चैतन्यनगर परिसरातील सह्याद्रीनगर येथे अरविंद नारलावार यांची पाच दुकाने आहेत. सकाळी सहाच्या एका दुकानातून धूर येत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. हळूहळू धुराचे लोळ वाढत जाऊन अखेर जोरदार आवाज झाला.

nanded
Mini Bus Fire : कोंढव्यात मीनी स्कूलबसला आग

त्यामुळे दुकानावरील टिनपत्रे उडून गेले. एकाचवेळी दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने राहुल परदेशी, अलीखान बडूखान, केशव शिंदे यांची दुकाने जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. दोन तासानंतर त्यांनी ही आग आटोक्यात आणल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com