नांदेडला १५ नव्याने कोरोना पॉझिटिव्ह तर २५ जणांना सुटी

अभय कुळकजाईकर
Tuesday, 19 January 2021

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी (ता. १९) आलेल्या ५२१ अहवालापैकी ५०४ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २२ हजार १२५ एवढी झाली असून यातील २१ हजार १८ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण ३२५ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील दहा बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

नांदेड - कोरोना संसर्गा संदर्भात मंगळवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार १५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे सहा तर ॲन्टीजेन किट्स तपासणीद्वारे नऊ बाधित आले. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या २५ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी (ता. १९) आलेल्या ५२१ अहवालापैकी ५०४ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २२ हजार १२५ एवढी झाली असून यातील २१ हजार १८ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण ३२५ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील दहा बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड - १९ मुळे जिल्ह्यातील ५७९ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासाठी तयारी सुरु, नऊ हजार ५०० शिक्षकांची कोरोना चाचणी होणार

घरी बरे होण्याचे प्रमाण वाढले
मंगळवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील सहा, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण येथील दहा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल पाच, खासगी रुग्णालयात चार असे एकूण २५ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.९९ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात दोन, उमरी तालुक्यात एक, किनवट दोन, यवतमाळ एक असे एकुण सहा बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्र सात, मुखेड तालुक्यात एक, माहूर एक असे एकुण नऊ बाधित आढळले.  

हेही वाचलेच पाहिजे - मध्यप्रदेशातील मुलास हिमायतनगरकरांचा आधार; भाकरीच्या शोधात भरकटलेला चिमुकला आईच्या कुशीत

३२५ बाधितांवर औषधोपचार सुरु 
जिल्ह्यात ३२५ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे २२, मुखेड कोविड रुग्णालय १८, हदगाव कोविड रुग्णालय एक, महसूल कोविड केअर सेंटर ३५, किनवट कोविड रुग्णालय पाच, देगलूर कोविड रुग्णालय नऊ, महापालिकाअंतर्गत गृहविलगीकरण १२३, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५०, खासगी रुग्णालयात २६ जण आहेत. मंगळवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १६६ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ७६ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.  

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

नांदेड कोरोना मीटर

  • एकुण स्वॅब - एक लाख ९६ हजार ५९१
  • एकुण निगेटिव्ह - एक लाख ७० हजार २८०
  • एकुण पॉझिटिव्ह - २२ हजार १२५
  • एकूण बरे - २१ हजार १८
  • एकुण मृत्यू - ५७९
  • आज प्रलंबित स्वॅब - ३९५
  • उपचार सुरू - ३२५
  • अतिगंभीर रुग्ण - दहा         

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded has 15 new corona positive and 25 new ones nanded news corona update