Naygaon: सुधारित आरक्षणात ओबीसींच्या २ जागा घटल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नायगाव नगरपंचायत

नायगाव : सुधारित आरक्षणात ओबीसींच्या २ जागा घटल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नायगाव : राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशानुसार शुक्रवारी (ता.१२) नायगाव नगरपंचायतमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत पार पडली. या वेळी नव्याने काढलेल्या आरक्षणात नागरिकांचा मागास प्रवर्गच्या २ जागा घटल्या तर सर्वसाधारणच्या २ जागा वाढल्या आहेत. या सुधारित आरक्षणाचा फटका ओबीसींना बसला आहे.

नायगाव नगरपंचायतची मुदत ता.२४ जानेवारी २०२१ रोजी संपली. त्या अगोदर निवडून द्यावयाच्या १७ जागेसाठी (ता.२७) नोव्हेंबर २०२० रोजी आरक्षण सोडत पार पडली होती. त्यावेळी प्रभाग क्र. ८,२,३ व १५ हे अनु जातीसाठी तर ३ व १५ महिलेसाठी आरक्षित करण्यात झाले होते. प्रभाग १४ मद्देवाड गल्ली हा अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाला. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी इश्वरी चिठ्ठ्या काढण्यात आल्यानुसार ५ प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर ७ प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या होत्या.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

(ता.१२) रोजी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश झगडे, तहसीलदार गजानन शिंदे, प्रभारी मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत झाली. या वेळी अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण वगळून सोडत काढण्यात आली. त्यात प्रभाग क्र.१, ११ व १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी (त्यात ७ आणि १७ प्रभाग महिलांसाठी) तर प्रभाग १, ४, ६, ९, १०, १२, १३ व १६ हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. (यात १, ६, ९ व १३ हे प्रभाग सर्वसाधारण महिला) नव्याने काढलेल्या आरक्षणात नागरिकांचा मागास प्रवर्गच्या २ जागा घटल्या तर सर्वसाधारणच्या २ जागा वाढल्या आहेत.

न्यायालयीन अध्यादेशातील तरतुदीनुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण तपासणे आवश्यक झाली होती. आयोगाने ही माहिती तपासली असता ५० नगरपंचायतींमध्ये आरक्षण मर्यादा ५० टक्क्यापुढे जात असल्याचे निदर्शनास आले असून तेथील ओबीसींच्या जागा कमी करणे आवश्यक आहे असे निर्देश दिल्याने नागरिकांचा मागास प्रवर्गच्या आरक्षणात नुकसान झाले तर दुसरीकडे सर्वसाधारण प्रवर्गासाठी ही फायद्याची बाब ठरली आहे.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

या आरक्षण सोडतीच्या प्रसंगी तलाठी बालाजी राठोड, अल्लमवाड, शेख यूनूस, नगरपंचायतचे संतराम जाधव, रामेश्वर बापुले, श्रीधर कोलमवार, माजी नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे, शिवसेचे माधव कल्याण, सय्यद एजाज, धनराज शिरोळे, चंद्रकांत चव्हाण, किशनराव बोमनाळे, कैलास भालेराव, जीवन चव्हाण, पंकज चव्हाण, गंगाधर कल्याण यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

loading image
go to top