Nanded Rukmini Ganeshotsav : भंगार वेचणाऱ्या बाप-लेकीच्या पालात ‘गणराय’; दीडशे-दोनशे रुपयांच्या कमाईत संसार; कागदपत्रे नसल्याने शिक्षणापासून ‘रुक्मिणी’ वंचित

Rukmini Remains Out of School Due to Lack of Documents : नांदेडच्या एअरपोर्ट रोडवरील पालात भंगार वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या दीपक पूयड आणि त्यांची १० वर्षीय मुलगी रुक्मिणी यांनी प्रतिकूल परिस्थितीत गणरायाची स्थापना केली.
Nanded Rukmini Ganeshotsav

Nanded Rukmini Ganeshotsav

esakal

Updated on

नांदेड : शहरातील एअरपोर्ट रोडवरून जाताना रस्त्याच्या कडेला असलेली काही पालं सहज नजरेस पडतात. दिवसभर पुठ्ठे, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि भंगार गोळा करण्यासाठी भटकंती आणि संध्याकाळी मिळणाऱ्या दोन-तीनशे रुपयांत उद्याची चिंता, अशा संघर्षमय जीवनातही एका पालात गणरायाच्या आगमनाने आनंद फुलला आहे. आईचे छत्र हरपलेली रुक्मिणी आणि तिचे वडील दीपक पूयड यांनी प्रतिकूल परिस्थितीतही श्रद्धेने गणपतीची स्थापना केलेली आहे.

दिवसभर उन्हातान्हात भंगार गोळा करून ते विकल्यानंतर दीपक आणि रुक्मिणी यांच्या हातात साधारण दोनशे ते तीनशे रुपये येतात. हाच त्यांच्या जगण्याचा आधार. काही वर्षांपूर्वी वाहनाच्या धडकेत रुक्मिणीच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हापासून दीपक हेच तिच्यासाठी आई-वडिलांचा आधार बनले आहेत.

Nanded Rukmini Ganeshotsav
IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

१० वर्षीय रुक्मिणीचे वय शाळेत जाण्याचे असले तरी कागदपत्रांच्या अभावामुळे ‘ती’ शिक्षणापासून वंचित आहे. पुणेगाव (ता.नांदेड) परिसरातून स्थलांतर करत हे कुटुंब नांदेडमध्ये पंधरा वर्षांपूर्वीपासून आलेले आहे. स्थिर घर आणि निश्चित रोजगार नसतानाही गणेशोत्सवाचा आनंद त्यांनी यंदाही जपला आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरी भक्ती आणि उत्साहात कोणतीही कमतरता नव्हती. परिसरातील नागरिका पूयड यांच्या श्रध्देचे कौतुक करत आहेत.

"अपघातात बायको गेल्यापासून मुलगी रुक्मिणी हीच माझा आधार आहे. आम्ही रोज पुठ्ठे, बाटल्या आणि भंगार गोळा करून मिळेल तेवढ्या पैशात घर चालवतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी गणपतीची पूजा करण्याची इच्छा दरवर्षी असते. मोठा खर्च करून उत्सव करता येत नाही; मात्र मनापासून गणरायाची पूजा केली की आम्हाला त्यातून समाधान मिळते."

-दीपक पूयड

Nanded Rukmini Ganeshotsav
Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

श्रद्धेने केलेली आरास मनाला भावणारी

झोपडीच्या बाजूला उपलब्ध साहित्य, रंगीत कागद आणि फुलांचा वापर करून छोटेखानी मखर तयार केले. त्यात गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली असून, गणेशोत्सवात रोज दिवा लावून मनोभावे पूजा केली जात आहे. मोठी सजावट किंवा रोषणाई नसली तरी श्रद्धेने केलेली ही आरास वाटसरूंच्या मनाला भावणारी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

The Story Behind 'Ashi Chik Motyachi Mal': History of the Iconic Ganpati Song
Ganesh Chaturthi 2026 | Aarti Collection
Ganesh Idol Broken News
Jalgaon Ganeshotsav
Marathi News Esakal
www.esakal.com