esakal | नांदेडमधील कोरोना लॅबची वर्षपूर्ती! सव्वालाख सॅम्पल टेस्टिंग
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडमधील कोरोना लॅबची वर्षपूर्ती! सव्वालाख सॅम्पल टेस्टिंग

नांदेड येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत कोरोना टेस्टिंग लॅब सुरु होऊन एक वर्ष झाले

नांदेडमधील कोरोना लॅबची वर्षपूर्ती! सव्वालाख सॅम्पल टेस्टिंग

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत कोरोना टेस्टिंग लॅब (corona testing lab) सुरु होऊन एक वर्ष झाले (one year has passed). या संपूर्ण वर्षभरात एक लाख २३ हजार २०८ रुग्णांची तपासणी (corona testing) करण्यात आली. (one year has passed since corona testing lab started under the department of microbiology at nanded)

हेही वाचा: फायरींगने नांदेड पुन्हा हादरले; मिल्लतनगर भागात जबरी चोरी

देशात मार्च २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून सर्वत्रच कोरोनाने थैमान घातले होते. सुरुवातीस मराठवाड्यातील सर्व थ्रोट स्वब हे पुण्याच्या एन.आय.व्ही. येथे पाठवली जात होती. त्यामुळे ट्रान्सपोर्ट तसेच निकाल येण्यासाठी विलंब होत असल्याने उपचार करणे सुद्धा अवघड होते. राज्य शासनामार्फत कोरोना उपचार व प्रतिबंधात्मक उपायांसंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. शिवाय संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत कार्यरत सर्व वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यासाठी हालचाली सुरु झाल्या.

हेही वाचा: नांदेड : तुटवड्याचे सोयाबीन बियाणे ज्यादा भावात उपलब्ध; शेतकऱ्यांच्या तक्रारी

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला. विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास लॅब उभारण्यासाठी लागणारी उपकरणे एच.डी.आर.एफ. फंड व तसेच DPDC फंडातून उपकरणे, वातानुकुलीत यंत्रे, लागणारे केमिकल्स कीट हे उपलब्ध करून दिली. परंतु, तपासणीसाठी डॉक्टर तंत्रज्ञ हे अनुभवी नसल्यामुळे त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.संजय मोरे यांनी सोलापूर येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर विभागातील डॉ. सुप्रिया एमेकर, डॉ. रोहित सिन्हा, डॉ. अनुजा सामाले तसेच इतर डॉक्टरांना डॉ. मोरे यांनी प्रशिक्षित केले.

हेही वाचा: दुचाकी व जबरी चोरी करणारे चोरटे जेरबंद; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सुरुवातीला रुग्णांची संख्या खूप असल्यामुळे येणारे रुग्णांचे सॅम्पलची संख्या ही जास्त होती. त्यानुसार उपलब्ध प्रयोशाळा तंत्रज्ञ प्रशिक्षित होऊन त्यांनी २४ तास ही प्रयोगशाळा चालू ठेऊन २४ तासाच्या आत रुग्णाचा रिपोर्ट मिळत असल्याने रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले. दररोज दोन हजार सॅम्पल तपासणीसाठी स्वयंचलित अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यामुळे डॉक्टर व तंत्रज्ञ यांनाही काम करण्यास हुरूप आला. या आजाराविषयी मनात भीती असतानाही प्रयोगशाळेतील सर्व डॉक्टर तसेच तंत्रज्ञ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक यांचे सहकार्य वाखाण्याजोगे आहे. विशेष म्हणजे सर्व कर्मचारी आपल्या घरी न जाता अलगीकरण केंद्रात राहूनच दिवस रात्र काम करत होते.

हेही वाचा: दिलासादायक बातमी : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे ५६४ रुग्ण; त्रीसुत्रीचा वापर करा- डाॅ. विपीन

सद्यस्थितीत कोरोना रिपोर्ट रुग्णाच्या मोबाईलवरच देण्याची यंत्रणा उभारल्याने रिपोर्ट घेण्यासाठी प्रयोगशाळेत पुऩ्हा येण्याची गरज नाही. सदरील प्रयोगशाळेत नांदेड व नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातून रुग्णांचे नमुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी येतात. प्रयोगशाळेच्या उभारणीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन, अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह डॉ. चक्रधर मुंगल, डॉ. मुकुंद कुलकर्णी, डॉ.स्मिता देशपांडे, डॉ. प्रतिभा माने, डॉ. तन्वी खिराडे, डॉ.कोमल कुलकर्णी, डॉ. राघवेंद्र स्वामी यांचा पुढाकार असल्याचे सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय मोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. (one year has passed since corona testing lab started under the department of microbiology at nanded)

loading image