esakal | अर्धापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक जाधव रुजू
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक जाधव रुजू

अर्धापूर शहर हे एक संवेदनशील शहर म्हणून पोलिस दप्तरी नोंद आहे.

अर्धापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक जाधव रुजू

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (नांदेड) : नांदेड जिल्हात सतत चर्चेत असलेल्या अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव (Police Inspector Ashok Jadhav) यांनी रविवारी (ता 13) पदभार स्विकारला आहे. त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय, गुटखा दारू विक्री, मोबाईल मटका, सावकरी आदी व्यावसायिकांवर वचक निर्माण करून गुन्हेगारी वृत्तीच्या इसमांवर धाक निर्माण करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.  (Police Inspector Ashok Jadhav has joined Ardhapur police station)

हेही वाचा: नांदेड : तुटवड्याचे सोयाबीन बियाणे ज्यादा भावात उपलब्ध; शेतकऱ्यांच्या तक्रारी

अर्धापूर पोलिस ठाणे मंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघ येते. तसेच अर्धापूर शहर हे एक संवेदनशील शहर म्हणून पोलिस दप्तरी नोंद आहे. या पोलिस ठाण्याचा कारभार गेल्या दोन ते अडीच वर्षाच्या काळात पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी सांभाळला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी पोलिस निरीक्षक अशोक जाधव रुजू झाले असून त्यांनी पदभार स्विकारला आहे. यापुर्वी ते जिल्हा पोलिस मुख्यालयात अर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते.

हेही वाचा: नांदेड : तुटवड्याचे सोयाबीन बियाणे ज्यादा भावात उपलब्ध; शेतकऱ्यांच्या तक्रारी

अर्धापूर पोलिस ठाण्यात रूजु झाल्यावर त्यांचा पोलिस अधिकक्ष व पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक आर .टी नांदगावकर, पोलिस उपनिरिक्षक के.के मांगुळकर, बळीराम राढोड, विद्यासागर वैद्य, बालाजी भोकरे, किर्तीकुमार रणवीर, महिंद्र डांगे, भिमराव राढोड, प्रकाश वावळे, पत्रकार लक्ष्मीकांत मुळे, सखाराम क्षिरसागर, गुणवंत विरकर, सामाजिक कार्यकर्ते शेख जाकेर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: दुचाकी व जबरी चोरी करणारे चोरटे जेरबंद; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य राहील. गुन्हेगारीवृत्तीला आळा घालून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न  केला जाईल अशी प्रतिक्रिया अशोक जाधव यांनी दिली. (Police Inspector Ashok Jadhav has joined Ardhapur police station)

loading image