बचतगटाचे अनुदान झाले बंद, महिलांची वाढली फसवणूक | Self Help Group | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

self help group

बचतगटाचे अनुदान झाले बंद, महिलांची वाढली फसवणूक

नांदेड : शहर व जिल्ह्यात महिला बचतगटांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. शासनाने वेळोवेळी मदत केल्याने राज्यभरात महिला बचतगटाचे मोठे पीक आले. मात्र, गेल्या काही वर्षांत सरकारने बचतगटांना अनुदान देणे बंद केल्यामुळे महिलांचा हिरमोड झाला. मात्र, असे असले तरी त्यांचे आर्थिक व्यवहार सुरुच आहे. अशाच बचत गटांचा लाभ घेत काही खासगी अर्थ संस्थांनी अवाजवी दराने कर्जे देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचे प्रकार दिसून येत आहे. घराला हातभार लागावा, आत्मनिर्भर बनावे म्हणून महिलांना बचत गट सुरु करण्याचे धोरण शासनाने सुरु केले. त्यामुळे राज्यभर महिलांनी बचत गट सुरु करून आत्मनिर्भर तर झाल्याच आहेत, शिवाय अनेकांनी उद्योगांमध्ये भरारी घेतली आहे. बचत गटातील (Self Help Group) महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची योजना सुरु केली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून बचतगटांना अनुदान मिळत नसल्याने महिलांचा खासगी अर्थसंस्था अवाजवी दराने कर्ज देऊन फसवणूक करत आहे. (Subsidy Of Self Help Group Close By Maharashtra Government Nanded)

हेही वाचा: मुख्यमंत्री ‘ठाकरीबाणा’ दाखवणार का ? : संभाजी पाटील निलंगेकर

गणेशनगर येथील स्वप्नजा कुलकर्णी यांनी सांगितले की, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीची स्थिती वाईट आहे. शासनाच्या अनेक योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे महिला बचत गटांकडे कोणतेही काम नाही. याचा फायदा काही खासगी आर्थिक संस्थांनी घेतला आहे. अधिक व्याजाने कर्ज देऊन त्यांची आर्थिक लूट करण्याचा प्रकार होत आहे. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही स्त्रोत नसल्याने बचत गटातील महिला त्याला बळी पडतात. अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थाकडून उत्पन्नात स्त्रोत निर्माण झाल्यास त्यांची लूट थांबविता येईल. सरकारनेही बचत गटाच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.(Nanded)

हेही वाचा: बाजारात मेथी ठरलीय कवडीमोल,पिंपळगाव रेणुकाईमध्ये शेतकरी त्रस्त

काय म्हणतात महिला...

ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद आणि शहरी क्षेत्रात नगरपालिका, महापालिकेने महिला आर्थिक धोरण राबविण्याची गरज आहे. लघु व्यवसाय करणाऱ्या महिलांसमोर आर्थिक समस्या असंख्य असतात. अशा प्रसंगी त्यांना मदत करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. सोबत त्यासाठी अनुदान देण्याचे नियोजन करावे. महिलांसाठी विविध योजनांचे नियोजन करावे. सद्यस्थितीत महापालिका हद्दीत राहूनही कोणत्याही योजना सामान्य माणसांसाठी नाहीत. प्रत्येक विभागाचे महिलांसाठी धोरण असले तरी नांदेड महापालिकेचे धोरण महिलांपर्यंत दिसून येत नाही. त्यामुळे महिलांचा प्रत्यक्ष सहभाग मिळविण्यासाठी थेट निधी द्यावा. तसेच दुकाने खरेदी करण्यासाठीही अनुदान द्यावे.

- स्नेहा वसंतराव गिरी, अशोकनगर.

--------

शहर व जिल्ह्यात हजारांवर बचत गट कार्यरत आहेत. त्या बचत गटांची आर्थिक स्त्रोत कमी आहेत. शासनाच्या योजनांचाही लाभ त्यांना मिळत नाही. अशा वेळी सर्व महिला बचतगटांना एकत्र करून त्यांची बचतगट बॅंक जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेने स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही मोठी क्रांती असेल.

- रत्नमाला सोनटक्के, सरपंचनगर, नांदेड.

केवळ अनुदानाच्या उद्देशाने स्थापन झालेले अनेक महिला बचत गट बंद होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे ज्या महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करत आहेत. स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचा भार स्थानिक स्वराज्य संस्थेने उचलावा, अशी अपेक्षा आहे. त्या माध्यमातून महिलांची एकजूट कायम राहील व त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळेल. - सुशीलाबाई व्यवहारे, सामाजिक कार्यकर्त्या.

Web Title: Subsidy Of Self Help Group Close By Maharashtra Government Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedSelf help group