जयंती विशेष : त्यागाचे प्रतिक- राष्ट्रपूत्र वीर भगतसिंग

file photo
file photo

नांदेड :  ज्याने कधीच  हात जोडले नाहीत, पण आज सारा भारत त्यांच्यापुढे नतमस्तक होतोय ते बुलंद व्यक्तीमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर शहिद एे-आजम वीर  भगतसिंग याचां आज जन्म दिवस. वीर भगतसिंग यांचा जन्म  ता. 28 सप्टेंबर रोजी झाला. तर  मृत्यू  मार्च २३, १९३१ रोजी झाला. वीर भगतसिंग देशासाठी ज्या वयात हसत हसत फासावर गेले , ते वय म्हणजे पोरा- सोरांनी हसत खेळत महविद्यालय आयुष्य मजा करण्याचं वय, पण हा देशप्रेमी आपल्या याच वयात देशासाठी आपले प्राण कुर्बाण करुन वयाच्या साडेतेवीसाव्या वर्षी फासावर जातोय, यालाच म्हणतात देशभक्ती, राष्ट्रभक्ती.. 

आज शहिद भगतसिंगाचा आदर्श खरच घेण्याची गरज युवा -तरुण वर्गाला का पडतोय. त्याचं एकमेव कारण म्हणजे आजचा युवा -तरुण  भरकटला आहे, मुख्य ऊद्दीष्टांपासुन तो दिशाहिन झाला आहे. म्हनुन ज्या वयात घडायचे असते त्याच वयात आपली पोरं बिघडायला लागली, याचं कारण म्हणजे आपण डि.जे. तालावर नाचयला लागलो , आणि पुस्तकं वाचनं विसरायला लागलो. धार्मीक ऊत्सवात या देशातला तरुण बरबटला जाऊ लागला. नको त्या गोष्टीमंध्ये तरुणांचा वेळ चालला, म्हणुन आज वीर भगतसिंग यांच्या नितीमुल्यांची गरज आजच्या भारतीय तरुणाला आहे. सगळेच तरुण दिशाहिन नसतात. ते चांगले विद्रोही उपक्रम राबवतात पण समाज त्यांना नावे ठेवत असतो. त्यासाठी ८० वर्षापुर्वीच वीर भगतसिंग अशा लोकांसाठी म्हणतात कि, "ज्यांना वाट चुकलेली पोरे म्हणतात, तीच पोरे क्रांती करतात...." 

ज्याचा स्वताच्या मनगटावर विश्वास नसतो तोच देवाचा जप करतो

आपल्याला जर तरुण वर्ग सुक्षिशित व यशस्वी करायचा असेल आपल्याला वीर भगतसिंग यांचा पराक्रमी व ज्वाजल्य इतिहास विसरुन चालणार नाही. प्रत्येक भारतीयाच्या मनात शहीद वीर भगतसिंगाचे विचार रुजवले पाहिजेत, वीर भगतसिंग हे नास्तीक होते, त्यानां देव ही संकल्पना मान्य नव्हती, ते म्हणतात की, ज्याचा स्वताच्या मनगटावर विश्वास नसतो तोच देवाचा जप करतो. फाशीवर चढवताना एक सरदार भगतसिंगाना म्हणतो. माझ्याजवळ धर्मग्रथ आहे. आता तरी काहीतरी वाच.त्यावर भगतसिंग म्हणाले.

जर मी प्रार्थना केली तर तुमचा देव मला भिञा म्हणेल

"आज, यावेळी जर मी प्रार्थना केली तर तुमचा देव मला भिञा म्हणेल. मी संपूर्ण आयुष्यात कधीही प्रार्थना केली नाही, ती मी आज केली तर तो म्हणेल की हा भितीपोटी प्रार्थना करतो आहे कारण आजवर मी तसा जगलो आहे. माझ्यावर कुणी असा आरोप करणार नाही की जन्मभर मी नास्तिक राहिलो पण अखेरच्या वेळी भितीपोटी आस्तिक झालो"

भारताचे भवितव्य नक्कीच उज्वल आहे

या देशातील तरूणांनी शहीदे आजम भगतसिंह यांचा आदर्श घ्यावा, बाबासाहेबांचे विचार घ्यावेत, सत्यशोधक महात्मा फुलेंचा विद्रोह, घ्यावा राजर्षि शाहू महाराज व महाराजा सयाजीराव गायकवाड यांची सर्वसमावेशकता घ्यावी, शंभूराजेंचा बाणेदारपणा व  करारीपणा घ्यावा, शिवरायांचा स्वातंत्र्यवादी आणि माणसाला माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोण घ्यावा. भारताचे भवितव्य नक्कीच उज्वल आहे. फक्त आपण जगाबरोबर बदलले पाहिजे. पण बदलत असताना आपण आपल्या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या शहिदांना मात्र विसरले नाही पाहिजे. नाही तर परत मलाच म्हणावे लागेल की, "हंसते हंसते जो फॉंसी वाले तक्तोंपर झूल गए, हमे हनीसिंग पता है पर भगतसिंग को भूल गए." 

त्यांच्या पुण्यतिथीला व जयंत्तीला आठवुन काढुन चालणार नाही

देशाला फक्त इंग्रजांपासुन मुक्त करणे हा त्याचां ऊद्देश नव्हता तर या देशातील प्रत्येक नागरिकाला, शिक्षण मिळाले पाहिजे, येथील विषमता नष्ट होऊन येथे समता, बंधुता निर्माण झाली पाहिजे, ते नेहमी म्हणायचे कि इंग्रज (गोरे) जातील पण परत आपलेच काळे आपल्याच गरिबांच्या ऊरावर बसतील, त्यासाठी येथील गरिब व श्रीमंत ही भिंत नाहिसी झाली पाहिजे या मताचे वीर भगतसिंग होते. असा विचार करणाऱ्या व भगतसिंग यांच्या विचारावर चालणाऱ्या आज देशात किती संघटना पाहायला मिळतात. फक्त त्यांच्या पुण्यतिथीला व जयंत्तीला आठवुन काढुन चालणार नाही, तर त्यासाठी त्यांच्या नास्तीक व पुरोगामी, तसेच देशाला भविष्याच्या बाजुने घेवुन जाणाऱ्या विर भगतसिंग विद्यार्थी परिषद सारख्या क्रांन्तीकारी संघटनांची नितांन्त गरज आहे. म्हनुन आपल्या आपले ऊद्दीष्ट हे मोठे ठेवण्याची गरज आहे. भगतसिंग म्हणतात "उद्दिष्टासाठी मरणे नव्हे, तर उद्दिष्टासाठी जगने आणि ते देखील लाभदायक होईल अशा योग्य पध्दतीने जगने, हा सर्वांसाठी प्रेरणादायी आदर्श असायला हवा." मग आमचा आदर्श हनीसिंग ठेवायचा कि भगतसिंग पाहिजे . हे मात्र आपल्या हातात आहे . 

जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला

वीर भगतसिंग यांच्या जिवणाविषयी थोड जाणुन घेवुयात. स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या हिरीरीने भाग घेणारे सरदार अर्जूनसिंग यांची तिन्ही मुले स्वातंत्र्यलढ्यात उतरली. किशनसिंग, सरदार अजितसिंग सरदार स्वर्णसिंह असा उज्वल वारसा असलेल्या घराण्यात, सरदार किशनसिंग आणि विद्यावती देवी यांच्या पोटी सरदार भगतसिंह यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले.

देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही

भगतसिंगांच्या अंगात लहानपणापासूनच स्वातंत्र्याचे वारे होते. लहानपणी शेतात बंदुकीची झाडे लावून त्यांना बंदुकी उगवण्याचा खेळ ते खेळत असत. लहान वयातच त्यांनी अनेक क्रांतिलढ्याची पुस्तके वाचून काढली. नवव्या इयत्तेत असताना त्यांनी विदेशी कापडाच्या होळ्या पेटवल्या. जालियनवाला बागेचे हत्याकांड त्यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण वोहरा तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. 

२३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर

लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्‍या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंब्लीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंब्लित बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले.  

भगतसिंग यांना इग्रंज न्यायालयाने फाशी सुनावली

नंतरच्या काळात मात्र त्यांच्या फाशीमुळे भारतात सर्वत्र क्रांन्तीचे वारे वेगाने वाढले . ज्यावेळेस भगतसिंग यांना इग्रंज न्यायालयाने फाशी सुनावली. भगतसिंगाना फाशी दिल्यानंतर देशात क्रांतीची लाट मोठ्या प्रमाणात वाढली इग्रंज सरकारविरोधात रयत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ऊतरली ...

साठ कोटी तरुण मुंडक्याचां भारत देश विचाराने सुध्दा तरुण होईल

अरे भगतसिंग असा एकमेव क्रातींकारक होता की परकियांना भगतसिगच्या मेलेल्या प्रेताची सुद्धा भिती वाटत होती. अरे इथे तर जिवंत पणी कोन कुनाला खात नाही पण ...भगतसिंगाना मात्र फाशी दिल्यावर सुध्दा इंग्रज सरकार भित होते . देशभरात जे क्रांतीचे आंदोलन सुरू केले आहे , त्याची प्रेरणा हि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात निर्माण केलेल्या स्वराज्यापासुन घेतली असे वीर भगतसिंग म्हणतात , असा ऊल्लेख राष्ट्रीय स्मारक ग्रंथात आढळतो. मग मित्रांनो आपण तर वीरांच्या , शुरांच्या, व संताच्या भुमित जन्माला आलो आहे. आपण तर विचाराने बेभान व्होवुन पेटले पाहिजे. मित्रानो हा लेख लिहण्यामागे एकच उद्देश कि या तरुन क्रांतीकारक भगतसिंगचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपन सर्वानी राजसत्ता , धर्मसत्ता , अर्थसत्ता , शिक्षणसत्ता, व प्रसार व प्रचार माध्यम सत्ता, पाच सत्तेत तरुण युवा वर्गाने आपले वर्चस्व निर्माण केल्यास हा साठ कोटी तरुण मुंडक्याचां भारत देश विचाराने सुध्दा तरुण होईल यात काही शंकाच नाही . 

शब्दांकन - संगमेश्वर लांडगे -जिल्हाध्यक्ष, विर भगतसिंग विद्यार्थी परिषद, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com