Jayant Patil : आदिवासी जमिनींचा मोठा घोटाळा उघडकीस? सभागृहात घणाघाती आवाज; जयंत पाटील यांचा प्रशासनावर थेट हल्ला!

आदिवासी जमिनी गैर-आदिवासींना देण्यासाठी जिल्हाधिकारी व शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असताना, नियमांना धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप.
Jayant Patil

Jayant Patil

sakal

Updated on

माहूर (जिल्हा नांदेड) - नांदेड जिल्ह्यातील माहूर व किनवट तालुक्यात आदिवासी जमिनींच्या बेकायदेशीर हस्तांतरणाचा धक्कादायक मुद्दा राज्य विधानसभेत गाजला.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बुधवार (ता. २५) रोजी सभागृहात हा विषय अत्यंत आक्रमक पद्धतीने मांडत प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com