एक लाखाच्या दारुसह अडीच लाखाचा ऐवज जप्‍त 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

शिवाजीनगर पोलिसांची आयटीआय परिसरात शनिवारी (ता. २३) दुपारी एक वाजताची कारवाई, दोघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

नांदेड : लॉकडाउनमध्ये काळ्या बाजारात विनापरवानगी विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून एक लाखाच्या दारुसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी आयटीआय चौकात शनिवारी (ता. २३) दुपारी एक वाजता केली. यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली. 

कोरोनाचा प्रादूर्भावर रोखण्यासाठी संबंध जगभरात चौथा लॉकडाऊन सुरू आहे. भारतातही चौथा लॉकडाउन सुरू असून जवळपास ८० टक्के बाजारपेठ उघडण्यात आली आहे. विशेष म्हणजे दारु विक्री आॅनलाईन व दुकानांना उघडण्यासाठी सहमती दिली आहे. मात्र काही महाभाग अजूनही चोरीच्या मार्गाने काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्यासाठी देशी व विदेशी दारुची वाहतुक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

येथे किल्क करा -  नांदेड कारागृहातील ६० कैद्यांची सुटका

सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांच्या पथकाची कारवाई

या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांनी शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांना कळविले. यावरून श्री. नरुटे यांनी आपले सहकारी तथा गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांना कारवाईच्या सुचना दिल्या. रवी वाहूळे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी आयटीआय चौक परिसरात सापला लावला. यावेळी अष्टविनायक इलेक्ट्रॉनिक्स शोरुमसमोरून संशयास्पद येणारी कार (एमएच२६-व्ही-२३३७) पोलिसांनी थांबविली. गाडीतील दोघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली. 

दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा 

यावेळी गाडीच्या डीक्कीमध्ये ६४ हजार ८०० रुपयाचे मॅकडॉल कंपनीचे नऊ बॉक्स आणि ३३ हजार ६०० रुपयाचे इम्पेरीअल ब्लु कंपनीचे पाच बॉक्स सापडले. असा ९८ हजार ४०० रुपयाची विदेशी दारु व दीड लाख रुपये किंमतीची कार असा अडीच लाखाचा ऐवज जप्त केला. रवी वाहूळ यांच्या फिर्यादीवरुन दारु वाहतुक करणारे परमेश्‍वर उर्फ पींटु गुलाबराव देशमुख (वय ४१) रा. अर्धापूर आणि सुशिल उत्तमराव देशमुख (वय ३८० रा. शिवाजीनगर, लहानकर यांचा वाडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा -  या’ कारणामुळे आईने फेकले बाळाला कंन्टेनरखाली...

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे, हवालदार संजय मुंडे, रामकिशन मोरे, लियाकत शेख, दिलीप राठोड,  विशाल अटकोरे, शिलराज ढवळे, राजकुमार डोंगरे आणि काकासाहेब जगताप यांचा कारवाईमध्ये समावेश होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two and a half lakh worth of liquor seized nanded news