Video - मंगल कार्यालय चालकांनी केले ‘या’ मागणीसाठी आंदोलन

अभय कुळकजाईकर
Tuesday, 8 September 2020

नांदेडला आॅल महाराष्ट्रा टेन्ट डिलर्स वेलफेअर आॅर्गनायझेशनच्या वतीने पदाधिकारी व सदस्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाचशे व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी या व इतर मागण्यांसाठी सोमवारी (ता. सात) आंदोलन केले. आंदोलनानंतर पदाधिकारी व सदस्यांनी शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. 

नांदेड - सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, कार्यालय, हॉल, लॉनच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी किंवा पर्यायी पाचशे व्यक्तीच्या उपस्थितीत लग्न व इतर कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी. तसेच केंद्र शासनाच्या सहायता पॅकेज अंतर्गत टेन्ट, मंडप, केटरिंग, बॅक्वेट, डीजे, लाईट डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक, सहभागी भागीदार आदींच्या आर्थिक अडचणींचा विचार करुन सहकार्य करावे, अशी मागणी करत आॅल महाराष्ट्रा टेन्ट डिलर्स वेलफेअर आॅर्गनायझेशन यांनी सोमवारी (ता. सात) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे.

नांदेडला आॅल महाराष्ट्रा टेन्ट डिलर्स वेलफेअर आॅर्गनायझेशनच्या वतीने पदाधिकारी व सदस्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाचशे व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी या व इतर मागण्यांसाठी सोमवारी (ता. सात) आंदोलन केले. आंदोलनानंतर पदाधिकारी व सदस्यांनी शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. 

हेही वाचा - भाच्याचा मृत्यू सहन झाला नसल्याने शंकर- पार्वती देवाघरी, कुठे ते वाचा...?

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली बैठक
दरम्यान, नवी दिल्लीशी संलग्न असलेल्या भारतातील सर्व शाखांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नुकतीच घेण्यात आली. चर्चेअंती केंद्र सरकारच्या राहत पॅकेज देण्याच्या संदर्भातील विषयानुसार चर्चा होऊन या पॅकेजमध्ये हॉस्पीटॅलिटी आणि इतर क्षेत्रातील कोरोनाने प्रभावित व्यवसायांना सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार मदत करण्याच्या विचाराधीन आहे. तेव्हा आम्ही या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील संबंधित व्यवसायधारकांना मदत करावी, अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

आर्थिक अडचणीमुळे मानसिक तणावही वाढला
कोरोनामुळे देश व देशातंर्गत व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्या अंतर्गत सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे टेन्ट, मंडप, केटरिंग, बॅक्वेट, डीजे, लाईट डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक आदी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित झाले आहेत. आर्थिक अडचणीमुळे मानसिक तणावही वाढत आहे. दरम्यान, सरकारने ५० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. मात्र, एवढ्या कमी संख्येत कार्यक्रम करण्यासाठी आयोजक सहमत नाही. कारण त्याचा खर्चही निघत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा विचार करुन सहकार्य करावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - गूड न्यूज ; सिध्देश्वर धरणाचे दहा दरवाजे उघडले

पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती
कोरोना संसर्गामुळे अजूनही अनेक ठिकाणी कार्यक्रम होत नसल्यामुळे संबंधित व्यवसायधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लाखो परिवारांना आर्थिक चिंतेने ग्रासले आहे. त्यामुळे आमच्या मागण्यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निवेदन देताना अध्यक्ष दडू पुरोहित, उपाध्यक्ष मोहमंद अन्वरोद्दीन, कोषाध्यक्ष आशिष नेरलकर, गोविंद शुक्ला, सागर चव्हाण, विजयसिंह परदेशी, राज गोडबोले, बाबूराव खिचडे, अझहर अली खान, अनिल कांबळे, निवृत्ती जिंकलवाड, बजरंग येमुल, साई पावडे, अनिल हंबर्डे, रुक्माजी यलगंद्रेवार, अन्वरभाई, महावीर ओसवाल आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Mars office drivers protest for this reason, Nanded news