Video - नांदेडला लोकसहभागातून वृक्षलागवडीचा संकल्प 

नांदेडला लोकसहभागातून वृक्षलागवडीचा संकल्प
नांदेडला लोकसहभागातून वृक्षलागवडीचा संकल्प

नांदेड - ज्येष्ठ नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी तसेच नारळी पोर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या निमित्याने सोमवारी (ता. तीन) एचआयजी व डीआरटी कॉलनीतील नागरिकांनी पुढाकार घेत ७५ वृक्षांची ट्री - गार्डसह लागवड केली.

महापालिका आणि वृक्षमित्र फाऊंडेशनतर्फे तसेच एचआयजी व डीआरटी कॉलनीतील नागरिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दीक्षा धबाले, आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार विठ्ठलराव जाधव, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त शुभम क्यातमवार यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

महापालिका व वृक्षमित्र फाऊंडेशनचा उपक्रम 
नांदेड शहरात महापालिका आणि वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित नांदेड अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यास नांदेडकरांचाही प्रतिसाद मिळत आहे. लोकसहभागातून अनेक कॉलनी आता हरित होत आहेत. लॉकडाउनच्या काळात एचआयजी व लगतच्याच डीआरटी कॉलनीधारकांनी वृक्षलागवडीचा संकल्प केला. प्रत्येक मालमत्ताधारकांना ट्री गार्ड देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक रहिवाशांनी ७५ ट्री गार्ड उपलब्ध करून दिले. वृक्षमित्र फाऊंडेशन ने महापालिकेला सोबत घेऊन खड्डे खोदणे व वृक्षलागवडीचे नियोजन केले.

पर्यावरणपूरक व फुलझाडांची लागवड 
उद्यान अधिक्षक डॉ. फरहत बेग आणि सहायक आयुक्त राजेश चव्हाण यांनी स्वागत केले. वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, अतुल डोंगरगावकर, कैलास अमिलकंठवार, प्रशांत रत्नपारखी, श्री. घोरबांड, नरेश यन्नावार यांनी सहकार्य केले. यावेळी नगरसेवक नागनाथ गड्डम, राजू यन्नम, माजी नगरसेवक विजय येवनकर, श्रीनिवास जाधव उपस्थित होते. तसेच कॉलनीतील गणेश श्रीमनवार, शेखर गावंडे, मनोहर बिडवई, अनिल डहाळे, राजरत्न गायकवाड, माधव पांचाळ, मोहमंद रियाझ, रितेश व्यवहारे, डॉ जयंत जोशी, राजू करवा, पेंडलवार,  हरीश पाटील, प्रा. मिलिंद भालेराव, पप्पू रूपानी आदी उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमात बकुळ, कदंब, लॅजरस्ट्रॉमीया, स्पथोडीया, कोनोकार्पेस अशी पर्यावरणपूरक व फुलझाडांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करावे 
हरीत नांदेड अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी व शहराच्या वाढत्या तापमानास नियंत्रित ठेवण्यासाठी या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने आपल्याला जमेल त्या जागेवर कमीत कमी एक झाड लावून त्याचे संगोपन करावे तसेच कॉलनीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन यावेळी महापालिका आणि वृक्षमित्र फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com