मतदार दिनानिमीत्त स्‍पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

सर्व खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी, महिला, नागरिकांना सहभागी होता येणार
nantional voters day
nantional voters daysakal

नांदेड : जिल्‍हा प्रशासनाकडून(nanded district administration) राष्‍ट्रीय मतदार दिनाच्‍या(National Voters Day) निमित्ताने शासन स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, नागरिकांनी व नवमतदारांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी(nanded collector) तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी (District Election Officer)डॉ. इटनकर यांनी केले आहे. या स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावी व पदवी, पदव्युत्तर वयोगटातील तसेच सर्व खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी, महिला, नागरिकांना सहभागी होता येणार असून, आकाश कंदील बनविणे व भित्तीपत्रक तयार करणे आदी स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहे.

nantional voters day
वाशिष्ठीचे उत्पन्न झाले पन्नास टक्के कमी; २ गटात ४०० ब्रास वाळू उपसाची परवानगी

या स्पर्धेत भाग घेणारे स्‍पर्धकांनी (विद्यार्थी) आकाशकंदील, भित्तीपत्रक तयार करून १९ जानेवारी पर्यंत आपल्या शाळा महाविद्यालयात अथवा तालुक्‍यातील संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत ता.२० जानेवारी पर्यंत जमा करावे.खुल्या गटातील स्पर्धक महिला व नागरिक यांनीही तयार केलेले आकाशकंदील, भित्‍तीपत्रक आदी संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत ता.२० जानेवारी पर्यंत जमा करावे. यातून विजेत्‍यामधुन तालुकास्‍तरावर प्रत्‍येक गटातून प्रथम, व्दितीय विजेते निवड करण्‍यात येतील.

nantional voters day
तहसीलदारांची परवानगी बंधनकारक; पन्नास टक्के क्षमतेच्या कार्यक्रमांसाठी अट

असे आहेत स्‍पर्धेचे नियम

  1. लोकशाही आकाश कंदीलावर निवडणूक विषयी मतदानप्रक्रीया, लोकशाही, मतदार नोंदणी, जागृती आदीबाबत संदेश, घेाषवाक्‍य, लोगो, चित्र असणे बंधनकारक आहे. स्‍पर्धक लोकशाही आकाश कंदील त्‍यांना हवा त्‍या आकाराचा बनवू शकतील आकाराचे बंधन नाही.

  2. लागणारे साहित्‍य-आकाश कंदील तयार करण्‍यासाठी पर्यावरणपूरक साहित्‍याचा वापर करावा. डिझायनिंग करण्‍यासाठीचे रंग, रंगीत पेपर, जिलेटिन पेपर, तसेच इतर साहित्‍य स्‍पर्धकांनी स्‍वत: आणून घरी लोकशाही आकाश कंदील तयार करावा

nantional voters day
Video : हिंगोली तालुक्यात ४० लाख किमंतीचा ४०० ब्रास रेतीसाठा जप्त

भित्‍तीपत्रक

भित्‍तीपत्रकाचा आकार रेग्युलर कलर पेपर आकाराच्या साईजचा असावा. भित्‍तीपत्रावर चित्रे, लिखीत मजकूर लिहीता अथवा चिकटवता येईल.परंतु निवडणूक(election subject) विषयी- मतदानप्रक्रीया,(voting process) लोकशाही(democracy), मतदार जागृती याबद्दल संदेश, घेाषवाक्‍य असणे बंधनकारक आहे. भित्तीपत्रकावर निवडणूक विषयक- लोकशाही, मतदार नोंदणी व मताधिकार याबाबतचे लोगो, चित्र ही काढता येईल. तसेच गाणी लोकशाहीची मतदान अधिकाराची ही संकल्पना घेऊन एक नवीन गीतरचना तयार करुन त्याचे जास्तीत जास्त चार मिनिटांचा व्हीडिओ बनवून (संगीत, नृत्य नेपथ्यासह) टेलीग्राम(telegram) ९२८४४५३८९९ वर ता.२३ जानेवारी पर्यंत पाठवायचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com