वाहरे...पठ्ठ्या ! लेटलतीफ कर्मचा-यांची उपसभापतींनी घेतली हजेरी, तब्बल 43 कर्मचा-यांवर होणार कारवाई  

लक्ष्मीकांत मुळे
Friday, 16 October 2020

कार्यालयात सकाळी पावने दहा वाजता हजर रहाण्याचे शासनादेश आसतांना सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत कर्मचारी येतच होते.खुद्द उपसभापती कार्यालयाच्या गेट जवळ टेबल टाकून बसल्याने सर्वांना एकच धक्का बसला व कर्मचारी आवाक झाले.

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचारी उशिरा येणे व लकजाणे ही नित्याचीच बाब झाली आहे.पंचायत समितीच्या कर्मचारी व अधिका-यांना उशिरा कार्यालयात येणे चांगलेच महाग पडले आहे.उशिरा येणा-या कर्मचा-यांची हजेरी शिवसेनेचे उपसभापती अशोक कपाटे यांनी शुक्रवारी (ता 16) यांनी घेतल्याने धक्कादायक बाब समोर आलीआहे.या कार्यालयातील सुमारे 60 कर्मचारी व कर्मचा-यांपैकी तब्बल 43 कर्मचारी आपल्या नेहमीच्या सवयी प्रमाणे दाखल झाले आहे.

कार्यालयात सकाळी पावने दहा वाजता हजर रहाण्याचे शासनादेश आसतांना सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत कर्मचारी येतच होते.खुद्द उपसभापती कार्यालयाच्या गेट जवळ टेबल टाकून बसल्याने सर्वांना एकच धक्का बसला व कर्मचारी आवाक झाले. दरम्यान या लेटलतीफ कर्मचा-यां विरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल आशी माहिती गटविकास अधिकारी मिना रायतळे यांनी दिली.

पाच दिवसाचा आठवडा मंजूर करून आदेश काढला

शासकीय कर्मचारी व अधिका-यांनी भांडून पाच दिवसाचा आठवडा करून घेतला आहे. शासनाने फेब्रुवारी मध्ये पाच दिवसाचा आठवडा मंजूर करून आदेश काढला. हे करित आसतांना कामाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. नविन आदेश प्रमाणे सकाळी पावने दहा वाजता कार्यालयात येणे व सायंकाळी सव्वा सहा वाजता कार्यालयातून जाणे आसे अपेक्षित आहे. पण असे चित्र कोणत्याही कार्यालयात दिसून येत नाही.

हेही वाचा -  नांदेडमध्ये ‘गर्ल्स सेफ्टी मिशन’ लवकरच- एसपी प्रमोद शेवाळे -

कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ टेबल टाकून बसले

अर्धापूर पंचायत समितीचे उपसभापती यांनी लेटलतीफ कर्मचा-यांची हजेरी घेण्यासाठी अशोक कपाटे यांनी शुक्रवारी सकाळीच साडे नऊ वाजता कार्यालयात आपली हजेरी लावली. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ टेबल टाकून बसले .उपस्थित पट,कर्मचा-यांचे नाव, आगमनाची वेळ नोंदवून सही घेण्यात येत होती. कर्मचारी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्या सवडीने येत होते. 

अधिकारी व कर्मचा-यावर कोणाचेही नियंत्रण नाही

पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचा-यावर कोणाचेही नियंत्रण राहीले नसल्यामुळे केव्हाही या व केंव्हाही जा आसा मनमानी कारभार चालू आहे.लोकप्रतिनिधी व सरपंच, नागरिक यांचे वेळेवर कामे होत नाही आशा तक्रारी आहेत.आशा कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही.

दुपारी बारावाजेपर्यंत कर्मचारी व अधिकारी येत होते

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजार राहत नाहीत .त्यामुळे नागरिकांना अधिकारी व कर्मचा-याची कामासाठी वाट पाही लागते आशा तक्रारी होत्या. लेटलतीफ कर्मचारी व अधिकारी यांची उपस्थित घेण्यासठी सकाळी साडे नऊ वाजता कार्यालयात आलो. सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत कर्मचारी व अधिकारी येत होते. या उशिरा येणा-या कर्मचा-यां विरूद्ध नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी आशी लेखी मागणी केली आहे आशी माहिती उपसभापती अशोक कपाटे यांनी दिली.

येथे क्लिक कराहिंगोली : सेनगाव तालुक्यात एका कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

दपारी बारा नंतर येणा-यांचा एक दिवसाचा पगार कपात करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल

कार्यालयात उशिरा येणा-या कर्मचारी व अधिकारी यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी आशी तक्रारी उपसभापतींनी केली आहे सकाळी बारा वाजेपर्यंत येणा-या कर्मचा-यांचा एक दिवसाचा अर्धापूर पगार तर दपारी बारा नंतर येणा-यांचा एक दिवसाचा पगार कपात करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल आशी माहिती गटविकास अधिकारी मिना रायतळे यांनी दिली..

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wow Attendance of late Deputy employees by Deputy Speakers, action will be taken against 43 employees nanded news