Navratri: सर्वाधिक काळ ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम करणाऱ्या आयर्न लेडी

थॅचर या सर्वाधिक काळ सलगपणे ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर कार्यरत राहणाऱ्याही त्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या.
आयर्न लेडी मार्गारेट थॅचर
आयर्न लेडी मार्गारेट थॅचर sakal

नवरात्री हे नऊ दिवसाचं प्रतिक आहे. या नऊ दिवसांमध्ये स्त्री शक्तीचा जागर केला जातो. आज आम्ही तुम्हाला इतिहासातील एका पावरफुल महिलेविषयी सांगणार आहोत त्या म्हणजे मार्गारेट थॅचर. ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर आज या जगात नसल्या तरी त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व कायम अजरामर राहील.

आयर्न लेडी मार्गारेट थॅचर
Britain PM Election : माझ्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही, पण मी मागं हटणार नाही : ऋषी सुनक

थॅचर या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्या सर्वाधिक काळ सलगपणे ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर कार्यरत राहणाऱ्याही त्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी सलग तीनवेळा निवडणुकीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाकडून निवडणूक जिंकली. १९७९ ते १९९० या काळात सलग त्या पंतप्रधान पदावर कार्यरत होत्या. 

आयर्न लेडी मार्गारेट थॅचर
Britain PM Election : माझ्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही, पण मी मागं हटणार नाही : ऋषी सुनक

अत्यंत हुशार चाणाक्ष आणि आयर्न लेडी म्हणून ख्याती मिळवलेल्या थॅचर प्रत्येक राजकारणीसाठी एक प्रेरणा आहे. त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असं त्याचं व्यक्तीमत्त्व होतंमार्गारेट थॅचर यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९२५ रोजी लिंकनशायरमधील ग्रॅंथम येथे एका साधारण कुटूंबात झाला होता. १९५९ मध्ये मार्गारेट थॅचर या उत्तर लंडनमधील फिंचले येथून कॉंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदार झाल्या. नंतर त्या पुढे शिक्षणमंत्री होत्या. १९७५ मध्ये त्यांनी तेव्हाचे पंतप्रधान एडवर्ड हिथ यांना आव्हान दिले.

१९७५ ते इ.स. १९९० या काळात हुजूर पक्षाच्या त्या अध्यक्षा राहल्या १९७९ ते ८० या कालावधीत त्यांच्याकडे देशाची सुत्रे आली. कॉंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या असलेल्या मार्गारेट थॅचर १९७९ ते १९९० या काळात पंतप्रधान होत्या. यामुळेच त्या २० व्या शतकातील सर्वात अधिक काळ ब्रिटनचे पंतप्रधान पद भूषविणाऱ्या महिला पंतप्रधान म्हणून त्याचं नाव घेतलं जातं

आयर्न लेडी मार्गारेट थॅचर
Modi-Zelenskyy: PM मोदींनी दिला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना धीर; म्हणाले, सैन्य...

याच काळात इंदिरा गांधी, सिरिमाओ भंडारनायके आणि मार्गारेट थॅचर या एकाच वेळी आपापल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी होत्या. त्यामुळे या तिघींचे मैत्रीसंबंध त्यावेळी चर्चेचा विषय होता. मार्गारेट थॅचर यांचा राजकीय प्रभाव इतता तगडा होता की त्यांनी त्यानी अवलंबिलेली राजकीय शैली ‘थॅचरिझम’ या नावाने आज जगप्रसिद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com