Navratri Festival 2019 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गंगाष्टक रूपात पूजा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 September 2019

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गंगाष्टक रूपात पूजा बांधण्यात आली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. उत्सवकाळात कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने चोख व्यवस्था ठेवली आहे.

करवीर निवासिनी अंबाबाईची त्रिपुरसुंदरी रूपात सालंकृत पूजा 

मंदिरात दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असून त्यालाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, काल पहिल्याच दिवशी दिवसभरात पासष्ट हजाराहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. 

Navratri Festival 2019 : इंटरनॅशनल बाईक रायडर 

आजच्या पूजेविषयी... 
जेंव्हा आदि शंकराचार्य काशीमध्ये होते. त्या वास्तव्यकाळात गंगाष्टक त्यांनी लिहिले असावे. गंगा नदीचे भारताच्या धार्मिक इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. गंगेच्या मूर्तीमध्ये तिच्या हातात अखंड जीवनप्रवाहाचे, अमृताचे प्रतिक म्हणून मंगल कलश असतो आणि ज्ञानाचे- पवित्रतेचे प्रतिक म्हणून कमळ असते. हे जुन्ह्यु ऋषींच्या कन्ये, हे जान्हवी गंगे, हे भीमजननी गंगे, तू पतितांचा, पापीजनांचा उध्दार करणारी आहेस. तू हिमालयातील पर्वतांमधून खळाळत वाहतेस आणि त्यांना शोभा आणतेस. तू सर्व प्रकारच्या पातकांचा नाश करणारी आणि तीन्ही लोकांमध्ये पवित्र आहेस, असे महात्म्य गंगाष्टकात सांगितले असल्याचे श्रीपूजक रामप्रसाद ठाणेकर, योगेश जोशी, श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. 

नवरात्रोत्सवात जोतिबा देवाची सोहन कमळ पुष्पात महापूजा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Karveer Nivasini Ambabai Puja