esakal | Navratri Festival 2019 : तेजस्विनी पंडित म्हणते, ‘सेव्ह आरे’
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri Festival 2019 marathi actres tejaswini pandit aarey forest photoshoot

पुणे : नवरात्रोत्सवात आपल्या अनोख्या फोटो शूटच्या माध्यमातून, सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आज, अष्टमीच्या निमित्ताने फोटो केला. मुंबईतील आरे कॉलनीतील जंगलात होत असलेल्या वृक्षतोडीकडं लक्ष वेधलंय.

Navratri Festival 2019 : तेजस्विनी पंडित म्हणते, ‘सेव्ह आरे’

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : नवरात्रोत्सवात आपल्या अनोख्या फोटो शूटच्या माध्यमातून, सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आज, अष्टमीच्या निमित्ताने फोटो केला. मुंबईतील आरे कॉलनीतील जंगलात होत असलेल्या वृक्षतोडीकडं लक्ष वेधलंय.

Navratri Festival 2019 : नाटकांतून समाज परिवर्तनाचा वसा

काय म्हणते तेजस्विनी?
या संदर्भातील पोस्ट शेअर करताना तेजस्विनीने म्हटले आहे की,अष्टमी "गावदेवी". थांब घाव घालू नकोस. याच्या मुळावर घालू नकोस. समस्येच्या मुळावर घाल. इतके रस्ते इतकी वाहन असूनही तुला ‘वेग’ कमीच वाटतोय का? तुझा प्रवास सुखकर आणि वेगाने होण्यासाठी तू आज यांचा प्रवास संपवतोयस? किती हतबल आहे मी. या संपत्तीला कसे वाचवू? किती जीव वैविध्याने सजवली होती मी हि वसुंधरा. यावर हक्क फक्त तुमचाच कधी झाला? जंगलं साफ करा वस्त्या वाढवा. रस्ते बनवा. सोय फक्त स्वत:चीच बघा. इतरांचे काय? ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे फक्त शोभेसाठीच न? Carbon dioxide कमी करणार असे सांगून स्वत: ची समजूत काढतोयेस का? मग निसर्गाने हे हिरवे नवल का रचले ? ते फक्त Carbon dioxide कमी करत नाहीत तर तुला ‘प्राणवायूचे’ वरदानही देतात. अनेकांचा आश्रय आज निर्दयतेने कापून काढला जातोय. तुमचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तुम्ही कुणाचा तरी प्रवास संपवत आहात. लक्षात ठेवा हा प्रवास आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील.

तेजस्विनी सांगतेय मुंबा देवीची व्यथा

विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष
अभिनेत्री तेजस्विनी पंडित दर वर्षी नवारात्रोत्सवात देवीच्या रुपातील फोटोंचे शूट करून, सोशल मीडियावर पोस्ट करते. यावर्षी तिने या फोटोंच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. कोल्हापुराती महापूराचे संकट, मुंबईची अवस्था, प्रदूषण याकडे लक्ष वेधल्यानंतर तेजस्विनीने आता आरे कॉलनीतील वृक्षतोडीकडे लक्ष वेधले आहे.

loading image