Navratri : नवरात्रीत सर्वाधिक कंडोम विक्रीमागचं कारणं तुम्हाला माहितीये?

नवरात्रीत कंडोम विक्री वाढते. ही बाब धक्कादायक असली तरी सर्वेक्षणातून समोर आली आहे.
Navratri
Navratriesakal

Condom sale Increases in Navratri : नवरात्र म्हटलं की, उत्साह, आनंद आणि गरबा हे चटकन डोळ्यासमोर येतं. नटून थटून आलेले तरूण तरूणी, रात्री रंगलेला गरब्याचा खेळ आणि स्वच्छंदी माहोल सर्वांनाच भूरळ घालतो. अशावेळी कंडोमची विक्री वाढते असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Navratri
Navratri 2022 : शक्तीचे अखंड रूप असलेली नवदुर्गा श्री लक्ष्मी

याकाळात गरबा डान्स कोरिओग्राफर, सेलिब्रिटीजला जशी मागणी वाढलेली असते तशी कंडोमचीही मागणी वाढत असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्ह यांचीपण मागणी वाढते. आपल्या मुलांविषयी चिंता वाटणारे पालक मुलांवर लक्ष ठेवायला असे डिटेक्टिव्ह नेमणं सोयीचं समजतात, असं सर्वेक्षणातून निदर्शनास आलं आहे.

Navratri
Navratri Garba Dance: गुजरातचा गरबा देशविदेशात पोहोचला, पण कसा? जाणून घ्या

काय आहेत कारणं?

तज्ज्ञांच मत आहे की, यात सिनेमाचा वाटा मोठा आहे. गरबा हा पूर्वापार खेळला जातो. आराधनेचा भाग म्हणून सुरू झालेल्या या गरब्याला सिनेमाने मोठे ग्लॅमर दिले. यावेळी तरूण तरूणी नटूनथटून गरबा खेळू लागले आणि त्यांच्यात आकर्षण निर्माण होणं ही निसर्ग सुलभ प्रक्रिया आहे. याशिवाय तज्ज्ञांच्या मते अजून दोन कारणं ठळक आहेत.

Navratri
Navratri 2022: स्वातंत्र्यदेवींचं रूप साकारून दिली मानवंदना, नवरात्रीत शौर्यजागर
  1. ऑक्टोबर महिन्याची उष्णता आणि रात्रीची हलकीशी थंडी यामुळे रात्री एक अल्हाददायक वातावरण निर्माण होतं. या काळात काही हार्मोनल बदल होऊन जोडपी आपसूकच सेक्सकडे वळतात.

Navratri
Navratri 2022 : अष्टमीला देवीच्या जागराला करा काळ्या चण्याची चविष्ट भाजी

2. त्याचप्रमाणे गरबा खेळण्यासाठी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहण्याची मुलांना परवानगी मिळालेली असते. त्यामुळे या काळात आपण बंधनमुक्त असल्याची भावना निर्माण होते. नवरात्रीच्या काळात दांडिया उत्सव गरबा खेळण्याच्या निमित्ताने तरुण तरुणी एकत्र येतात. शारीरिक जवळीकतेमुळे आकर्षण वाढणे हे नैसर्गिकच आहे. म्हणूनच अशावेळी जोडप्यांमध्ये संबंध निर्माण होणे साहजिक आहे, असे तज्ज्ञांचं मत आहे.

Navratri
Navratri 2022 : महिषासुराच्या रुपात गांधींजींची प्रतिमा; हिंदू महासभेच्या दुर्गा पूजेवरून वाद

संबंध ठेवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी यात गैर काही नाही, ही नैसर्गिक बाब आहे. पण यासोबत भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची आपल्यात क्षमता आहे का, याचा आधी विचार करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com