Navratri : तुम्हाला नवरात्र व्रताचे प्रकार माहीत आहे का? जाणून घ्या शास्त्रीय महत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri 2022

Navratri : तुम्हाला नवरात्र व्रताचे प्रकार माहीत आहे का? जाणून घ्या शास्त्रीय महत्व

Navratri 2022 : अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्रोत्सव सुरु होत आहे. या काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र व्रताचे विविध प्रकार असतात यानुसार नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नवरात्र व्रताचे विविध प्रकार यांसह नवरात्रात केल्या जाणाऱ्या पुजेचे शास्त्रात सांगितलेले महत्व आपण जाणून घेवूया. (Types of Shardiya Navratri Utsav 2022 Importance of spiritual scientific significance)

हेही वाचा: Navratri 2022 | देवीच्या आगमनानंतर करु नये ही कामे, घटस्थापनेपुर्वी उरकून घ्या

असे आहे नवरात्र कुळाचाराचे महत्व

नवरात्र व्रताचे महत्व अन् नवरात्रोत्सव साजरा करताना व्रताचे शास्त्तोक्त प्रकार सांगताना धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे म्हणतात, नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुळधर्म असून तो सर्वत्र कटाक्षाने पाळला जातो. घरोघरी घटस्थापना मोठ्या उत्साहात केली जाते. नवरात्रीचा हा उत्सव प्रत्येक घरोघरी आपल्या कुळातील प्रथेप्रमाणे केला जातो. म्हणून याला कुळधर्म असेही म्हणतात. आपण देवघरात रोज पुजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाअधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे.

नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे. अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. राम-रावणाच्या युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केल्याचा उल्लेख आहे.

हेही वाचा: Shardiya Navratri 2022 : यंदा घटस्थापनेला विशेष योग, जाणून घ्या मुहूर्त

नवरात्र व्रताचे प्रकार

आपण वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील आपल्या कुळातील परंपरेनुसार नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्याप्रमाणे या व्रताच्या प्रकारांनुसार विविध कुटुंबात कुळाचार साजरा केला जातो. याकाळात देवीची उपासना. देवीसाठी व्रत वैकल्ये केली जातात.

1) संपूर्ण नवरात्री व्रत

एक ते नऊ या प्रमाणे प्रतिपदा ते नवमी या काळात संपुर्ण नवरात्र असते. अनेक कुटुंबात संपुर्ण नवरात्रीचा कुळाचार भक्ती भावाने साजरा केला जातो.

2) सप्तरात्री व्रत

हे व्रत करताना प्रतिपदेपासून व्रतवैकल्य करण्यास सुरुवात होवून सप्तमीला त्याचे उद्यापन केले जाते.

हेही वाचा: Navratri 2022: जोगवा का मागितला जातो ?

3) पंचरात्री व्रत

पंचरात्री नवरात्र व्रत पुजन करताना प्रतिपदेपासून म्हणजेच घटस्थापनेपासून नाही तर पंचमीपासुन पुजा अर्चेला सुरुवात केली जाते, जी नवरात्री पर्यंत असते.

4) त्रिरात्री व्रत

सप्तमीपासून या व्रताला सुरुवात केली जाते, जे नवमीला पुर्ण होतं. सप्तमी ते नवमी काळात त्रिरात्र नवरात्रोत्सव साजरे केले जाते.

देवीच्या अखंड उपासनेसाठी त्रिरात्री व पंचरात्री व्रत

त्रिरात्री व पंचरात्री नवरात्री व्रत हे कुळधर्मानुसार तर केलेच जाते मात्र ज्या भाविक- भक्तांचे घटस्थापनेला पुजन करणे शक्य होत नाही त्यांनी यानुसार नवरात्रोत्सव साजरा करावा. याने देवीच्या उपासनेत कुठलाही खंड पडणार नाही व देवीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहील.

हेही वाचा: Sharadiya Navratri 2022: नवरात्रीचे नऊ दिवस वास्तुशास्त्रातल्या या गोष्टींचे पालन केल्याने देवीचा आशीर्वाद मिळू शकतो