डेन्मार्कची कोरोनावर मात; कशी ते वाचा वृत्तांत

Vikas-Pathak
Vikas-Pathak

डेन्मार्क हा स्कॅन्डेनेव्हियामधील छोटा देश. लोकसंख्या ५८ लाख. जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच डेन्मार्कमध्ये कोरोनाची लागण फेब्रुवारीच्या अखेरीस झाली, परंतू मार्चच्या पहिल्या आठवड्यात लक्षणीय वाढ सुरु झाली. अर्थातच हा प्रसार बाहेरच्या देशातून आलेल्या प्रवाशांमुळे होत असल्याने बाहेरील कोरोनाग्रस्त देशातून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचे अनिवार्य विलगीकरण लागू केले. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात वाढ जोरात झाल्याने सरकारने त्वरित पावले उचलली. सर्वप्रथम देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जर्मनी आणि स्वीडन च्या सीमा डेन्मार्कला लागून आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कोरोना टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आणि लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. सर्वप्रथम शाळा, कॉलेज, सार्वजनिक संस्था, शॉपिंग मॉल्स आदी  बंद केले. परंतु आवश्यक दुकाने, मेडिकल स्टोअर्स चालू ठेऊन तेथे सुरक्षित अंतर ठेवण्याचे आदेश दिले. आवश्यक सेवा सोडल्यास सर्वाना ‘वर्क फ्रॉम होम’ चे आवाहन  केले. दहापेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले. हवाई वाहतूक बंद केली.

सरकारने वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन जनतेला माहिती व सल्ला दिला. या पत्रकार परिषदेत स्वतः पंतप्रधान, आरोग्यमंत्री, पोलीस प्रमुख तसेच इतर  अधिकारी हजर असतात  व जनतेला मार्गदर्शन करतात तसेच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देतात. त्यामुळे एकप्रकारची पारदर्शकता व जनतेत विश्वास निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले.

लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध नसल्याने लोक बाहेर वॉक, जॉगिंग, सायकलिंग आदी व्यायाम प्रकार सहज पणे करू शकतात.  तसेच जीवनावश्यक वस्तूंची मुबलक उपलब्धता असल्यामुळे दैनंदिन जीवन फारसे विस्कळीत झाले नाही.

अर्थातच या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाय. बऱ्याच उद्योगधंद्यांना नोकरकपात तसेच पगारकपात यासारखे उपाय करावे लागले. तसेच छोट्या उद्योगांचे बरेच नुकसान झाले. परंतु सरकार त्यांना आर्थिक मदत करत आहे. डेन्मार्कची समाजव्यवस्था ही समाज कल्याण (Social welfare) या तत्वावर आधारली आहे.

त्यामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत सरकार करत असते. सध्या परिस्थिती सुधारत असून जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सर्वप्रथम सरकारने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. ऑफिसमध्ये कर्मचारी जाण्यास सुरवात झाली आहे. अजून जनजीवन पूर्णपणे सुरळीत होण्यास कदाचित २-३ महिन्यांचा अवधी लागेल. तोपर्यंत इतर निर्बंध कायम राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com