सायकलिंगमधून जपा फिटनेस अन्‌ काम ही करा पूर्ण..!

cycling is best option for fitness
cycling is best option for fitness

कोल्हापूर - कामासाठी सायकल वापरणे हे आता मागे पडत जाऊन फिटनेससाठी सायकलींचे महत्त्व वाढले आहे. एकेकाळी सायकल वापरणे ही चैन असायची. कालांतराने त्यात बदल होऊन सर्वाधिक गरजेचे आणि कामासाठीचे सर्वोत्कृष्ट वाहन म्हणून सायकल वापरली जाऊ लागली. फिटनेस राखण्यासाठी आणि त्याचबरोबर स्वतःची रोजची कामे पूर्ण करण्यासाठी सायकलचा वापर सर्रास होत आहे. सायकलमध्ये सध्या अनेक बदल झाले आहेत. इलेक्‍ट्रिक मोटार असणाऱ्या सायकलमुळे तर दुचाकीला सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणूनही सायकल पुढे आली आहे.
मधल्या काही काळात प्रत्येकाच्या आयुष्यातील ही सायकल बाजूला पडली. दुचाकी गाड्यांनी हे मार्केट काबीज केले. यामुळे सायकल ही फक्त एक अडगळीतील वस्तू बनली होती. मात्र, सध्या फिटनेस अवेअरनेस वाढल्यामुळे या सायकलींना पुन्हा सुवर्णकाळ येऊ लागला आहे.

दुहेरी फायद्याने सायकलींना पुन्हा येतोय सुवर्णकाळ

कोल्हापूरमध्ये सध्या सायकलचे देशीच नाही तर विदेशी ब्रॅंडही उपलब्ध आहेत. यात जगप्रसिद्ध असणाऱ्या पाच महत्त्वाच्या ब्रॅंड्‌सनी तर भारतातच या सायकलची निर्मिती सुरू केली आहे. यावरून सायकलचे सध्याचे महत्व अधोरेखित होते. सायकलमधील गिअरच्या सुविधेमुळेही वापर वाढला आहे. सोबतच आयर्नमॅन सारख्या जागतिक स्पर्धांमुळेगी ‘त्या’ सायकलचे महत्त्व वाढतेच आहे. शिवाय जिल्हा, राज्य, आणि राष्ट्रीय पातळीवर सायकलच्या अनेक स्पर्धा होतात. त्यामुळेच शाळांमध्ये सायकल महत्त्वाची ठरत आहे. मात्र, योग्य सायकल निवडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कोल्हापूरमध्ये अनेक नामवंत कंपन्यांच्या सायकल उपलब्ध असून, त्यासाठी लागणारी सर्व सामग्री आणि ती दुरुस्त करण्याच्या वस्तूही आहेत. कोल्हापूरमध्ये कोणत्याही ब्रॅंडची सायकल रिपेअर करण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती आहेत. अनेक दुकानदारांनी विक्री ते विक्रीपश्‍चात सेवा ठेवल्यामुळे ग्राहकांचा ओढा या सायकलकडे वाढत आहे.

कोल्हापुरात देशासह जागतिक ब्रॅंड उपलब्ध 

येथील बाजारपेठेत जगभरात विख्यात असणारे पाच  ब्रॅंड उपलब्ध आहेत.  भारतातील नामवंत ब्रॅंडही आहेत. लहान, मध्यम आणि उंच आकारातील सायकली आहेत. याच्यामध्ये वयोमानानुसार आणि उंचीनुसार बदल होत राहतो. अगदीच नऊ हजार रुपयांपासून एक लाख ९० हजार रुपयांपर्यंतच्या कामासाठी तसेच फिटनेससाठी वापरल्या जाणाऱ्या चांगल्या दर्जाच्या सायकल बाजारपेठेत आहेत. शिवाय मागणीनुसार सायकल उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये स्वतःच्या सोयीनुसार मेटल फ्रेम, अलॉय फ्रेम, कार्बन फायबर फ्रेम घेऊ शकतो. कोल्हापूरमध्ये यूएसए, युरोपियन, जर्मन, तसेच तैवानी असे जागतिक नामांकित ब्रॅंड आहेत. पुरुषांत सोबतच महिलांसाठीही उपयुक्त अशा विविध डिझाइन्स आणि रंगसंगती उपलब्ध आहेत.

ई सायकल...

इलेक्‍ट्रिक सायकल भविष्यात उत्पादनातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. यात पारंपरिक सायकलला बॅटरी आणि मोटर जोडून त्याचे ई बाईकमध्ये रूपांतर करण्यात आले. अवघ्या २२ हजार रुपयांपासून सुरवात होणाऱ्या या सायकलने कोल्हापूरकरांना भुरळ घातली आहे. भारतातील नामवंत ब्रॅंड आणि भारतीय बनावट असणाऱ्या या सायकलमध्ये दुचाकीसारखे एक्‍सलेटर आहे. ताशी २५ किलोमीटरचा अधिकतम वेग असणाऱ्या तसेच सायकलसारखे पॅंडल मारूनही ही चालविता येत असल्याने या सायकलचा दुहेरी वापर होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषणही होत नसून, स्वतःचा व्यायाम होण्यासही मदत होते. 

सायकल व सायकलिंग हे फक्त खेळ किंवा खेळणे नसून, एक लाइफस्टाइल बदलणारे घटक आहेत. फिटनेसबरोबरच विरंगुळा आणि काम याद्वारे पूर्ण होऊ शकते. स्वतःच्या आयुष्यातच अामूलाग्र बदल घडविणारे हे साधन असून, त्याने शरीरातील अनेक व्याधी कमी होण्यास आणि नियंत्रण ठेवण्यास सोपे जाते. 
- मिथिल परमाळे, विक्रेते
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com