आता भाविकांची पावले वळू लागली जोतिबा डोंगराकडे

निवास मोटे
Thursday, 19 November 2020

.. चांगभलचा सात महिन्यानंतर जयघोष सूरू झाला अन् भाविकांच्या  कपाळी गूलाल लागला ..

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) :श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर ता. पन्हाळा येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात चार दिवसात सुमारे आठ हजार भाविकांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची दर्शन घेतले. यावेळी चांगभलच्या जयघोषाने डोंगर दणाणून गेला. तब्बल सात महिन्यानंतर डोंगरावर चांगभलचा जयघोष सुरू झाला असून भाविकांच्या कपाळी गूलाल लागला आहे . भाविकांची पावले डोंगराच्या दिशेने वळू लागली आहेत.

 
 दिपावली पाडव्याच्या मुहुर्तावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे वतीने मंदिरात केदार सहस्रनाम केदार कवच पठण  लघुरुद्र अनुष्ठान पुण्या वाचन मातृकापूजन मुख्य देवता स्थापन नवग्रह पूजन रुद्र स्वाहाकार हवण इत्यादी धार्मिक विधी सकाळपासून संपन्न झाल्यानंतर सकाळी ९ वाजता भाविकांसाठी दुपारी १२ पर्यंत मंदीर उघडण्यात आले . त्यावेळी जोतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, सरपंच राधा बुणे, नायब तहसीलदार श्री .कौलवकर, सहा पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, समस्त दहा गावकर, पुजारी इत्यादी उपस्थित होते.

हेही वाचा- किती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम मात्र शिवसेनेवरच 

सात महिने चोवीस दिवसानंतर जोतिबा मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यामुळे सर्व अटी व नियमांचे पालन करून भाविकांना मंदिरात सोडले जात होते.  भाविकांच्या कपाळी माखलेला गुलाल व दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचं समाधान सर्व काही सांगून जात होत . सात महिन्यानंतर  जोतिबा मंदिरात चांगभलचा जयघोष सुरू झाला. दीपावलीची सुट्टी असल्यामुळे   भाविक पर्यटक मोठ्या संख्येने  डोंगरावर दाखल झाले आहेत .पण मंदिरात सोडण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत असल्याने या वेळेत येणाऱ्यानीच दर्शन घेतले .इतर भाविकांना मात्र कळस दर्शनावर समाधान मानावे लागले .
 

अनेक भाविक जोतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी धडपड करीत होते. मंदिर उघडण्याची   ते वाट  पाहात होते.  मंदिर उघडले आणि  दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली . देवाच्या दर्शनाने त्यांचे समाधान झाले .कपाळी माखलेल्या गूलालामुळे भाविक अधिकच आनंदून गेले .

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 thousand people visit on jyotiba temple kolhapur