अभिनेते महेश कोठारे यांना  कलायात्री पुरस्कार जाहीर 

actor Mahesh Kothare Kalayatri Award announced entenment marathi news
actor Mahesh Kothare Kalayatri Award announced entenment marathi news

कोल्हापूर :  नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा कलायात्री पुरस्कार यंदा अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांना जाहीर झाला आहे. येथील शाहू स्मारक भवनात 1 मार्चला सायंकाळी 5 वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे. 
रुपेरी पडद्यावर बुलंद अभिनयाचा ठसा उमटवणारे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या 11 व्या जयंती दिनानिमित्ताने पुरस्कार वितरण होत आहे. दानवे यांच्या कन्या जयश्री दानवे, त्यांचे बंधू राजवर्धन दानवे परिवारातर्फे गेली 35 वर्षे सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच भाग म्हणून नाटक, चित्रपट, मालिकांत अभिनयाचा ठसा उमठविणाऱ्या कलावंतांना कलायात्री पुरस्कार देण्यात येतो.

दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, अरुण नलवडे, सुबोध भावे, डॉ. गिरीश ओक, अविनाश नारकर आदींना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोठारे यांचे चित्रपट, मालिका, नाट्य या क्षेत्रातील दीर्घकाळाचे योगदान विचारांत घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणानंतर श्री. कोठारे यांची प्रा. डॉ. सुजय पाटील मुलाखत घेणार आहेत. ही माहिती श्री. दानवे परिवार, सुधीर पेटकर यांनी दिली आहे. 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com