वस्त्र नगरीत वाचन संस्कृती जपण्यासाठी केला जातो 'असा' प्रयत्न....

An Attempt Is Made To Preserve The Culture Of Reading in Ichlkaranji Kolhapur Marathi News
An Attempt Is Made To Preserve The Culture Of Reading in Ichlkaranji Kolhapur Marathi News

इचलकरंजी (कोल्हापूर) : चार महिन्यांपूर्वी सुरू झालेला वाचन कट्टा हा उपक्रम आता अधिक बहरू लागला आहे. सुरवातीला चार ते सहा वाचकांनी सुरू केलेल्या या उपक्रमात आता नियमितपणे ३० ते ४० जण सहभागी होऊ लागले आहेत. मराठी भाषा संवर्धन आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वस्त्रनगरीत आणखी एका नव्या उपक्रमाची भर पडली आहे.

वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शहरात काही संस्थांमार्फत नियमितपणे उपक्रम सुरू आहेत. मनोरंजन मंडळ, आपटे वाचन मंदिर यांसारख्या संस्था बालमनातच वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करतात. विशेषत: सुटीच्या दिवसांमध्ये मुलांना पुस्तकाचा खजिनाच उघडून देण्यात येतो. पाहिजे ते पुस्तक घ्यावे आणि वाचत बसावे, अशा या उपक्रमातही शेकडो विद्यार्थी सहभागी होतात.

साहित्यप्रेमीचा पूढाकार

येथील साहित्यप्रेमी चित्कला कुलकर्णी व त्यांच्या मैत्रिणींनी नियमितपणे वाचन सुरू करण्यासाठी काहीतरी उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला. सुरवातीस बाळकृष्णबुवा स्मृती मंदिर येथे हा उपक्रम सुरू झाला. त्यानंतर उपलब्ध जागेनुसार ठिकठिकाणी या उपक्रमाला गती येत आहे.यासाठी व्हॉटस्‌अप ग्रुप केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी कार्यक्रमांची माहिती देण्यात येते. गद्य साहित्य, निसर्ग आणि पक्षी, माजी आवडती कविता, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कविता व ललित लेख अशा अनेक विषयांवर यापूर्वी वाचन झाले.

माय मराठी ज्ञान भाषा

प्रत्येक वेळी एक विषय पूर्वी जाहीर करण्यात येतो व त्यानुसार त्यासाठी प्रत्येकाला वेळ देण्यात येतो. सादरकर्त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे मराठी नाट्य वाचन, काव्य वाचन, लेख अभिवाचन असे कोणतेही प्रकार सादर करण्याची मुभा या वाचन कट्ट्यामध्ये देण्यात येते. माय मराठी मुळातच ज्ञान भाषा आहे. आधुनिक जगात तिच्या संवर्धनासाठी आणि ती भाषा समृद्ध करण्यासाठी सुरू असलेला हा उपक्रम एक पाऊल पुढे टाकणारा ठरत आहे.

सादरकर्ते आणि श्रोतेही
या वाचन कट्ट्यात सादर करणारे अनेक जण असतात. मात्र, त्याचे श्रोतेही मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. तास- दीड तासाच्या या उपक्रमात अनेक माहितीचे ज्ञान मिळत असल्याने या उपक्रमाला प्रतिसाद वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com